

प्रेम चोप्रा यांच्यावर ओपन-हार्ट सर्जरीची आवश्यकता न पडता TAVI प्रक्रीया यशस्वीरीत्या पार पडली आहे. जावई शरमन जोशीने त्यांच्या तब्यतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या तब्यतीबद्दल हेल्थ अपडेट समोर आली आहे. त्यांच्या जावयाने आणि अभिनेता शरमन जोशीने प्रेम चोप्रा यांच्या तब्येतीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. अलीकडेच प्रेम चोप्रा यांच्यावर ओपन-हार्ट सर्जरीची आवश्यकता न पडता एक विशेष हार्ट प्रक्रिया करण्यात आल्याने शरमनने म्हटलंय. TAVI ही प्रक्रीया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले.
बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रा ८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सात दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यांना हार्टशी संबंदित समस्या होत्या. शरमन जोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत म्हटले आहे की, प्रेम चोप्रा यांना गंभीर एओर्टिक स्टेनोसिस (severe Aortic Stenosis) ची समस्या झाली होती. यासाठी त्यांच्यावर TAVI (Transcatheter Aortic Valve Implantation) प्रोसिजर करण्यात आले होते.
या प्रक्रियेत प्रेम चोप्राच्या हार्टच्या एओर्टिक व्हॉल्वला ओपन हार्ट सर्जरविना ठिक करण्यात आलं होतं. शरमनने हे देखील सांगितलं की, प्रेम आता ठिक झाले आहेत. त्यांना रुग्णलायतून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत.
गंभीर एओर्टिक स्टेनोनिस एक अशी हार्ट कंडीशन आहे, ज्यामध्ये एओर्टिक व्हॉल्व (aortic valve) पातळ होते. यामध्ये हार्टमध्ये मेन चेंबर ते शरीर आणि एओर्टामध्ये ब्लडच्या फ्लोमध्ये अडथळा येतो. त्यामुळे श्वास फुलतो, छातीत दुखणे आणि बेशुद्धावस्था होते.
शरमन जोशीने सासरे प्रेम चोप्रा यांच्या आरोग्याची अपडेट देत म्हटले की, 'आपल्या परिवाराकडून मी हृदय रोग विशेषज्ज्ञ आणि इंटरवेन्शनल कार्डियोलॉजिस्टचे मनापासून आभार मानतो. माझे सासरे प्रेम चोप्रा यांच्यावर खूप चांगले उपचार केले. वडिलांना गंभीर एओर्टिक स्टेनोसिस निदान झाले होते. डॉ. राव यांनी विना ओपन-हार्ट सर्जरी TAVI प्रक्रियेने यशस्वीपूर्वक व्हॉल्व बदललं. आता वडील घरी आहे आणि त्यांची प्रकृती ठिक आहे. असाधारण मदत आणि देखभालीसाठी आम्ही सदैव त्यांचे आभारी आहोत.'