‘श्रेयश – दि किंग जेडी’च्या ‘मैदान मार’ गाण्याचा जोश

maidaan maar new marathi song release
maidaan maar new marathi song release
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना  घेऊन येतो. त्याची गाणी नेहमीच थिरकायला लावणारी आणि अनोखी असतात. पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गाण्यात वेगवेगळे प्रयोग करणारा श्रेयश आता 'मैदान मार' हे जोशपूर्ण गाणे घेऊन आला आहे. हे गाणे शौर्य आणि देशभक्तीवर आधारित असून तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे.

या गाण्यात श्रेयश आपल्याला सैनिकी वेषात दिसत आहेत. जवानाच्या वेशात तो अतिरेक्यांशी सामना करत आहे तर शिवरायांच्या मावळ्याच्या वेषात तो लढवय्येपणाची शिकवण देत आहे.

श्रेयशच्या दमदार आवाजातील या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर या त्रिनीती ब्रदर्सनी संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन, त्रिनीती ब्रदर्स आणि श्रेयशचे असून गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि छायाचित्रीकरणाची धुरा मनीष भट याने सांभाळली आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news