

सुप्रीम कोर्टने नुकताच आदेश दिला आहे कि दिल्ली एनसीआर परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून शहराच्या बाहेर शेल्टर होममध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीला न्यायालयाने जवळपास 8 आठवड्याचा कालावधी दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की एकदा या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्यानंतर पुनः रस्त्यावर सोडले जाणार नाही. (Latest Entertainment News)
याला विरोध करत अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुली ने x पोस्ट केली. पण तिच्या पोस्टला कडाडून विरोध एका युजरने केला आहे. भली मोठी पोस्ट लिहीत त्या युजरने रुपालीवर बीफ खाण्याचा आरोप केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये हा युजर म्हणतो, ‘ जेव्हा तुम्ही चिकन, मटन, बीफ, मासे खाता. अशा वेळी तुम्हाला रस्त्यावरच्या कुत्र्यांची दया येण्याचा काय अधिकार?
जनावरांच्या बाबतचे प्रेम सगळ्या जनावरांवर समान लागू आहे. घरी उत्तम दर्जाचे कुत्रे पाळून तुम्ही त्याबाबतचे खोटे प्रेम जाहीर नाही करू शकत.
जे भटक्या कुत्र्यांबाबत बोलत आहेत त्यांनी रोज शेल्टर होमला जावे. त्यांना खाऊ घालावे, काळजी घ्यावी, गरज वाटल्यास तिथे राहावेही. तुम्हाला कुणीच आडवणार नाही. किंवा पैसे साठवून त्यांच्यासाठी शेल्टर बनवावे किंवा 10 भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे. त्या कुटुंबांना भेटा ज्यांनी आपल्या जिवलगांना रेबिजमुळे गमावले आहे. नेहमी बातम्या पाहा. किंवा आपल्या कुटुंबीयांना रेबिज होण्याची वाट पहा. तेव्हा तुम्ही भुंकणार नाही.’
यावर रुपालीनेही तितकाच खरमरीत रिप्लायही दिला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘मी रोज बेघर जनावरांना अन्न खाऊ घालते. मी ज्या जनावरांना खाऊ घालते त्यांचे नियमित लसीकरण आणि नसबंदी केली जाते. मी शेल्टर होम्स आणि गौशाळेचे समर्थन करते. फक्त माझ्या शहरातच नाही तर संपूर्ण भारतातील. मला गर्व आहे की मी शाकाहारी आहे. मी बेघर कुत्र्यांचे समर्थन करते. माझ्या घरी एक पण परदेशी जातीचे कुत्रे नाही. माझा मुलगा लहानपणापासूनच अशा बेघर समजल्या जाणाऱ्या जनावरांसोबत खेळला आहे. त्यांना प्रेम आणि दया ही भावना समजते. ही धरती सगळ्यांची आहे.
रुपालीने आपल्या पोस्टमध्ये कुत्र्याला काळभैरवाचे रक्षक सांगत तीने त्यांना माणसाचा खरा मित्र संबोधले आहे. त्यांना अचानक बाजूला करणे हे दयाळूपणाचे लक्षण नाही असे तीने म्हणले होते.