Bollywood nepotism: 'मला घराणेशाही वादाचा फटका बसला', अध्ययन सुमनला असं का वाटतं?

Shekhar sumans son adhyayan suman: पण शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनसाठी मात्र नेपोटीझम जणू काही शाप बनले आहे
Image Of Actor adhyayan suman
adhyayan suman on nepotismPudhari
Published on
Updated on

Actor Adhyayan Suman on Nepotisam

मुंबई : कोणत्याही सेलिब्रिटीच्या मुलासाठी नेपोटीझम ही करियर बनवण्याची शिडी असते. पण शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनसाठी मात्र नेपोटीझम जणू काही शाप बनले आहे. त्याच्या मते नेपोटीझमने करिअर खराब केले आहे. कारण त्यामुळे त्याला कोणीही काम देत नाहीये.अध्ययन गेली 17 वर्षे इंडस्ट्रीमध्ये आहे. पण तरीही त्यांचा कामासाठी संघर्ष अजूनही सुरूच आहे.

अगदी अलीकडेच तो संजय लीला भन्साळींच्या सुपरहिट सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बाजारमध्येही झळकला होता.

Image Of Actor adhyayan suman
Tripti Dimari: Beach Bebe तृप्ती डिमरीचे हे Sun Kissed लूक पहाच

अध्ययन सुमन यापूर्वी 2009 मधील राज या सुपरहिट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्याचे सिनेमे फारसे यश मिळवू शकले नाही. त्यानंतर तो 2024 मध्ये आलेल्या सुपरहिट सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बाजारमध्येही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. पण त्यानंतर मात्र त्याला एकही ऑफर मिळताना दिसत नाही. एका प्रसिद्ध पोर्टलशी बोलताना तो म्हणतो हीरामंडच्या यशानंतरही काम मिळणे कठीणच आहे.

Image Of Actor adhyayan suman
TV actor robbery : रामायणात राम- सितेचे पात्र साकारलेल्या कलाकारांच्या घरात चोरी; या जवळच्या व्यक्तीनेच केली होती चोरी

पुढे तो म्हणतो, नेपोटीझम ही एक निरर्थक वाद आहे. केवळ ट्रेंड म्हणून एखाद्या विषयावर बोलण्यासारखे नेपोटीझमबाबत बोलले जात आहे. मी असं म्हणू शकतो की मी नेपोटिझमचं जिवंत उदाहरण आहे, कारण मला नेपोटिझममुळे कुठलंच काम मिळालं नाही. मी हे सिद्ध करू शकतो. मी चांगले सिनेमे मिळावेत यासाठी प्रयत्न केले. वाटही पहिली. पण तस काहीच झाले नाही. खूप काळ मी हेच विचार करत राहिलो की मला योग्य संधी का मिळत नाहीये. हिरामंडीनंतरही सिनेमे नाही मिळाले तेव्हा मला वाटले मला अजिबात काम मिळालं नाही. आता मी कोणाला दोष देऊ? स्वतःला, की इंडस्ट्रीमधल्या लोकांना?" माझ्या घरात सगळ्या सुखसोयी आहेत. पण मला याची जाणीव आहे त्या वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे. माझे घर मला एका आलीशान जेलसारखे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news