Gurmeet Debina theft
गुरमित चौधरी आणि देबीना बॅनर्जी ही जोडी अनेकांची लाडकी आहे. सोशल मिडियावर ते अनेकदा व्हीडियो आणि फोटोच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. पण हे दोघेही सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. या दोघांच्या घरी चोरी झाली आहे. गुरमितने स्वत:ही बाब चाहत्यांशी शेयर केली आहे. त्यांच्या घरी असलेल्या नवीन नोकराने ही चोरी केल्याचे समोर आले. (Entertainment News Update)
गुरमितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही घटना सर्वांना सांगितली. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना सतर्कही केलं. की कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची शहानिशा करा.
गुरमीतने घरी दिवसांपूर्वीच या नवीन नोकराला कामावर ठेवले होते. त्याने घरातील काही मौल्यवान समान घेतले आणि निघून गेला. त्यातल्या त्यात महत्वाची बाब अशी की त्याने या नोकराला कामावर ठेवताना त्याचे व्हेरीफिकेशन केले होते. त्यामुळे या चोराला लगेच पकडण्यातही आले. याचवेळी त्याने आभार मानले की घरात असलेल्या त्याच्या दोनही मुलींना त्या चोराने काही इजा केली नाही.
विशेष म्हणजे चोरी झाली तेव्हा गुरमित घरीच होता. तो घरी असताना देखील ही चोरी घडल्याने त्याने चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहनही केले आहे.
गुरमीतने सांगितले की चोरी झालेले सामान बऱ्यापैकी परत मिळवण्यात यश आले आहे. पण तो आणि त्याचे कुटुंबीय सुरक्षित आहेत ही त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.
गुरमीतने काही महिन्यांपूर्वीच नवीन घर घेतले आहे. तो पत्नी देबीना आणि दोन्ही मुलींसह नव्या घरात शिफ्ट झाला आहे. सोशल मिडियावर त्याने त्याच्या या नवीन घराची झलकही शेयर केली होती.