Shefali Jariwala Police Investigation | शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांची चौकशी; पती पराग त्यागीचा जबाब नोंदवला

Shefali Jariwala Police Investigation | शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केलीय, पराग त्यागी, घरातील नोकर आणि कूकचीही चौकशी सुरु आहे.
Shefali Jariwala - Parag Tyagi
Mumbai Police Investigation Shefali Jariwala death Instagram
Published on
Updated on

Mumbai Police Investigation after Shefali Jariwala death

मुंबई - अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २७ जूनच्या रात्री तिला कार्डियक ॲरेस्ट आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. शेफाली जरीवालाच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली. अंबोली पोलिस स्टेशनमध्ये घरातील नोकर आणि कुकची चौकशी केली जात आहे. तसेच नातेवाईकांचाही जबाब नोंदवला जात आहे.

मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब त्याच्या घरी नोंदवला. आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. यापूर्वी, पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, तिच्या मृत्यूमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि ते अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Shefali Jariwala - Parag Tyagi
Shefali Jariwala Song Fee | वडिलांनी 'कांटा लगा'साठी दिला होता नकार; तरीही शेफालीने इतक्या पैशांत केलं गाणं

सूत्रांच्या माहितीनुसार, शेफालीला बेशुद्धावस्थेत घेऊन पती पराग त्यागी, आणि अन्य तीन लोकांसमवेत शुक्रवारी रात्री मुंबईतील अंधेरी स्थित बेलेव्यू रुग्णालयात पोहोचले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. आता तिचे शव पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Shefali Jariwala - Parag Tyagi
Rashmika Mandanna Mysaa |"रश्मिका बनली 'मैसा', पोस्टरमध्ये दिसला तिचा सगळ्यात हटके अंदाज"

शेफालीने २००८ मध्ये बूगी-वूगी, २०१२-२०१३ मध्ये नच बलिए ५, २०१५-२०१६ मध्ये नच बलिए ७ आणि बिग बॉस १३ (२०१९-२०२०) मध्ये ती दिसली होती. २०२४ मध्ये शैतानी रस्मे चित्रपटात ती दिसली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news