Rashmika Mandanna next project Mysaa movie
मुंबई - पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदाना हिचा देशभरात प्रचंड चाहता वर्ग आहे आणि तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात की ती पुढे काय करणार आहे. कालच रिलीज झालेल्या एका जबरदस्त पोस्टरनंतर रश्मिकाच्या पुढच्या सिनेमाचं – ‘मैसा’ – जोरदार लॉन्च करण्यात आलं, जिथे बॉलिवूड आणि टॉलीवूडमधील अनेक स्टार्सनी शुक्रवारी सकाळी अधिकृत पोस्टर शेअर केलं. ‘पुष्पा २ : द रूल’ नंतर रश्मिका 'मैसा' साठी सज्ज झाली आहे.
अनफॉर्मूला फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमात एका स्त्री योद्धीची हिम्मत, धैर्य आणि लढ्याची कहाणी उलगडली जाणार आहे. या सिनेमाचा पोस्टर खरंच "आतापर्यंत कधीही न पाहिलेला" असाच लूक देतो, ज्यामध्ये रश्मिका मंदानाच्या चेहऱ्यावरचं तेज आणि तिच्या नजरेतून झळकणारं आत्मविश्वास सहज जाणवतो.
प्रोडक्शन हाऊसनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं:
"हौसल्यामध्ये वाढलेली,
इराद्यांमध्ये ठाम,
ती गर्जते,
ऐकवण्यासाठी नाही, तर घाबरवण्यासाठी.
सादर करतोय @rashmika\_mandanna तिच्या आतापर्यंतच्या सर्वात तीव्र रूपात – #MYSAA मध्ये."
दिग्दर्शक: @rawindrapulle
निर्माता: @unformulafilms
एक पॅन इंडिया फिल्म O #RashmikaMandanna
रश्मिका स्वतःही या प्रोजेक्टबद्दल खूपच उत्साहित दिसतेय. तिनं सिनेमाचं टायटल आणि लूक सोशल मीडियावर शेअर करत एक खास कॅप्शन लिहिलं: "मी नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन... काहीतरी वेगळं... आणि काहीतरी थरारक देण्याचा प्रयत्न करते...आणि हे... हे अगदी तसंच एक प्रोजेक्ट आहे..."
"एक असा पात्र जे मी कधीही साकारलं नव्हतं...एक अशी दुनिया जिथे मी कधी गेली नव्हते...आणि माझं असं रूप जे सुद्धा कधी पाहिलं नव्हतं...हे रागाने भरलेलं आहे... खूप दमदार आहे... आणि पूर्णपणे खरं आहे. माझं थोडंसं टेन्शन आहे पण तितकंच समाधानही. मी खरंच वाट पाहू शकत नाही की तुम्ही बघा आम्ही काय बनवत आहोत... आणि हे तर फक्त सुरुवात आहे..." ☄️🔥 #Mysaa
हा सिनेमा एक जबरदस्त भावनिक अॅक्शन कथा असणार आहे, जी आपल्याला गोंड आदिवासींच्या अनोख्या आणि आजवर न पाहिलेल्या जगात घेऊन जाते.
याशिवाय रश्मिकाकडे आगामी काळात अनेक दमदार प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच आयुष्मान खुरानासोबत मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी ‘थामा’मध्ये दिसणार आहे. तसेच चाहत्यांच्या अत्यंत प्रतीक्षेत असलेल्या ‘पुष्पा 3’मध्येही ती तिच्या आयकॉनिक श्रीवल्लीच्या भूमिकेत परतणार आहे. ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘रेनबो’ सारख्या चित्रपटांमध्येही ती वेगवेगळ्या भावना आणि जबरदस्त पात्रं साकारणार आहे, जे सिद्ध करतात की रश्मिका प्रत्येक शैलीमध्ये दमदार आणि चॅलेंजिंग भूमिकांसाठी पूर्णपणे तयार आहे.