

Shefali Jariwala Kaanta Laga Song Fee
मुंबई : एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनलेली शेफाली जरीवालाचे हार्ट ॲटॅकने निधन झाले. तिच्या करिअरमधील सर्वात लोकप्रिय ठरलेलं गाणं म्हणजे 'कांटा लगा'. या एका गाण्यामुळे ती रातोरात स्टार बनली होती. पण, खूप कमी लोकांना माहिती असाली की, शेफालीने या गाण्यासाठी किती पैसे घेतले होते.
तिच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शेफाली मोठमोठ्या प्रोजेक्ट मध्ये दिसली नसली तरी कांटा लगा गाण्यातून ती प्रसिद्धीझोतात आली होती. या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं होतं. खरंतर हे गाणे करण्यासाठी तिच्या वडिलांनी नकार दिला होता. त्यावेळी ती कॉलेजमध्ये शिकत होती. तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे.
शेफालीने आपल्या वडिलांचे म्हणणे न ऐकता या गाण्यासाठी होकार दिला. शेफालीने एका मुलाखतीत सांगितले की, 'कांटा लगा' व्हिडिओ सॉन्गसाठी तिला ७ हजार रुपये मिळाले होते.
रिपोर्टनुसार, 'कांटा लगा' हिट झाल्यानंतर शेफाली पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली नव्हती. तिने आरोग्याचं कारण सांगितलं होतं. तिला भीती होती की, शूटिंगवेळी तिची तब्येत बिघडेल. दीर्घकाळ तिने कुठल्याही गाण्यासाठी होकार दिला नाही.
शेफाली जरीवालाने पुढे काही म्युझिक व्हिडिओज केले. ती पराग त्यागी सोबत नच बलिए ५ मध्येही दिसली. अखेरीस तिला बिग बॉस-१३ मध्ये पाहण्यात आलं होतं.