Shehnaaz Kaur Gill : जॉर्जियाच्या पार्टीत पांढऱ्या कलरच्या कॉर्सेट टॉपमध्ये शहनाजचा जलवा (video)

Shehnaaz Kaur Gill : जॉर्जियाच्या पार्टीत पांढऱ्या कलरच्या कॉर्सेट टॉपमध्ये शहनाजचा जलवा (video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या ईद पार्टीनंतर 'बिग बॉस १३' फेम आणि अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा एकदा खान कुटुंबासोबत दिसली. शहनाज ( Shehnaaz Kaur Gill ) नुकतेच अरबाज खानची मैत्रीण जॉर्जिया एंड्रियानीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचली. या पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या आगामी चित्रपटात दिसणारी अभिनेत्री शहनाज गिल जॉर्जियाच्या वाढदिवसाची पार्टीत स्पॉट झाली. या पार्टीत शहनाजने पांढऱ्या रंगाच्या कॉर्सेट टॉप आणि पँटमध्ये तर जॉर्जियाने ब्लॅक कलरचा शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. शहनाज आणि जॉर्जिया दोघेही खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात दिसत होत्या. हा व्हिडीओ विरल भयानी यांच्या इंन्स्टाग्रावर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'with birthday ? girl #giorgiaadriani'. असे लिहिले आहे.  व्हिडीओला #shehnaazgill असा हॅसटॅगदेखील दिला आहे. या व्हिडीओतील खास म्हणजे, शहनाजने जॉर्जियाला प्रेमाने केक भरवून तिला किस करताना दिसली आहे. यावेळी दोघेजणी काही मोजकेच मित्रमैत्रीणीसोबत मौजमस्ती करताना दिसल्या. हा व्हिडीओ चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

यानंतर शहनाज ( Shehnaaz Kaur Gill ) या पार्टीतून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी शहनाज आणि जॉर्जिया एकत्र कारमध्ये बसलेल्या दिसल्या. यावेळी शहनाजला तिच्या चाहत्यासाठी काही तरी बोलण्यास सांगितले. यावर उत्तर देताना तिने 'चाहते माझी आर्मी' असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news