Shah Rukh khan: 'किंग'च्या सेटवर शाहरुख खान जखमी, पाठीला दुखापत; शूटिंग पुढे ढकलावे लागले, नेमकं काय घडलं?

आगामी सिनेमा किंगच्या सेटवर जखमी झाल्याची बातमी समोर येते आहे
Entertainment News
Shah Rukh khanpudhari
Published on
Updated on

सुपरस्टार शाहरुख खान आपल्या आगामी सिनेमा किंगच्या सेटवर जखमी झाल्याची बातमी समोर येते आहे. त्याला कमरेला मार बसला आहे. एका अॅक्शन सिक्वेन्स दरम्यान त्याला ही दुखापत झाल्याचे समोर येत आहे. शाहरुखच्या दुखापतीमुळे सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. सिद्धार्थ आनंद याच्या सिनेमादरम्यान ही घटना घडली आहे.

या सिनेमात शाहरुख गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे अॅक्शन सीनही शाहरुखला डोळ्यासमोर लिहिले गेले असल्याचे सांगितले जात आहे. जखमी झाल्यानंतर शाहरुखला लगेचच युएस नेले गेले. तिथेच त्याच्यावर उपचार केले जात असल्याचे समोर येत आहे.

Entertainment News
Smriti Mandhana: 'My Biggest Cheerleader' म्हणत बॉयफ्रेंड पलाशने स्मृती मानधनासाठी केली स्पेशल पोस्ट

एका पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार शाहरुखची जखम मसल इंज्यूरी प्रकारात मोडते आहे. शाहरुखची सगळी टीम त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे. यामुळे शाहरुखवर छोटी सर्जरी करावी लागल्याचेही समोर येत आहे.

यापूर्वीही अनेकदा शाहरुख शूटिंग करताना जखमी झाला आहे. या दुखपतीनंतर मात्र शाहरुखला एक महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला गेला असल्याचे समजते आहे. रिकव्हरीनंतरच शाहरुख किंगच्या टीमला पुन्हा जॉइन करणार असल्याचे समोर आले आहे.

किंगच्या शूटिंगवर काय परिणाम होणार?

जुलै, ऑगस्ट हे महीने यशराज स्टुडियोमध्ये या सिनेमाच्या साठी बूक केले होते. पण आता शाहरुखच्या अचानक उद्भवलेल्या एमर्जनसीमुळे पुढे ढकलल्याचे सूत्रांनी सांगितले. या सिनेमात अभिषेक बच्चन असल्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे.

शाहरुख सध्या कुठे आहे?

सर्जरीनंतर शाहरुख सध्या यूकेमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. या अपघातानंतर त्याने आपली श्रीलंका ट्रीपदेखील पोस्टपोन केल्याचे समोर येत आहे. विश्रांतीनंतर तो डायरेक्ट सप्टेंबरमध्ये शूटिंग सुरू करू शकतो.

Entertainment News
Santosh Juvekar: संतोष जुवेकरला ट्रोलर्सबाबत विकी कौशलने दिला होता हा सल्ला

किंग सिनेमाविषयी..

शाहरुख त्याचा सिनेमा किंगला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी पुरेपूर मेहनत घेताना दिसतो आहे. त्याने या सिनेमाची कास्टिंगही तगडी निवडली आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयादीप अहलावत, अनिल कपूर, सौरभ शुक्ला आणि अभय वर्मा यासारखे कलाकार आहेत.

शाहरुख आणि सेटवरचे अपघात

  • शाहरुख यापूर्वीही अनेकदा जखमी झाला आहे. डर सिनेमाच्या वेळी त्याच्या बरगड्या आणि डावा घोटा दुखवला आहे

  • कोयला सिनेमाच्या वेळी शाहरुखला गुडघ्याच्या अपघाताला सामोरे जावे लागले होते. याशिवाय रा. वन आणि फॅन सिनेमाच्या वेळीही अपघातग्रस्त गुडघ्याच्या दुखण्याचा त्याला सामना करावा लागला होता.

  • दुल्हा मिल गया सिनेमाच्या वेळी त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती. यांचा परिणाम आणि त्रास त्याला माय नेम इज खान सिनेमाच्यावेळीही सहन करावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news