अभिनेता संतोष जुवेकर अलीकडेच छावा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने 2025 मध्ये सगळ्यात सुपरहिट सिनेमाचा मानही पटकावला आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. रायजी माळगे या मावळ्याची भूमिका त्याने यावेळी साकारली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर संतोष जुवेकर कमालीचा ट्रोल झाला होता.
त्याच्या एका मुलाखतीदरम्यान त्याने अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेबाबत संतोषने शूटिंग दरम्यानचा एक किस्सा शेयर केला होता. त्यावरून अनेक मीमही व्हायरल झाले होते.
पण यावर आता संतोषने विकीसोबत या ट्रोलिंगबाबत झालेल्या प्रकाराबाबत तोंड उघडले आहे. एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना त्याने हा किस्सा शेयर केला आहे. संतोष म्हणतो, ‘ छावा सिनेमाच्या सक्सेस पार्टी दरम्यान मी विकी आणि उतेकर सरांना भेटलो. ते दोघेही मला भेटून खुश झाले. विकी मला म्हणाला तू तर माझ्यापेक्षा जास्त फेमस झालास. संत्या या गोष्टी तू सोडून दे. त्यांचा इतका विचार करू नकोस. तू माणूस म्हणून कसा आहेस? कोण आहेस तुझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त विचार कर. जे ट्रोल करतात त्यांचा विचार करू नकोस. हे होतच राहते.’
या सिनेमात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेत होता. त्यावेळी तो या व्यक्तिरेखेत असल्याने मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहात नव्हतो किंवा त्याच्याशी बोललोही नाही असे विधान संतोषने एका मुलाखतीमध्ये केले होते. या विधानावरून तो बऱ्याच ट्रोलही झाला होता. संतोषच्या विधानावर बरेच मिम्सही त्यावेळी व्हायरल झाले होते.
संतोष जुवेकरला या मुलाखतीमध्ये जेव्हा विचारले गेले. की ट्रोल करणाऱ्याविषयी त्याला काय वाटते? तेव्हा तो म्हणाला, ' मला ट्रोल व्हायचे टेंशन नाही. मला आता त्याची सवय झाली आहे. मी जेव्हा अभिनेता बनायचा निर्णय घेतला, त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा सगळ्यांना सांगितले होते तेव्हाही ट्रोल झालो होतो. त्यावेळी घरच्यांनी, मित्रांनी मला वेड्यात काढले होते. ते एकप्रकारचे ट्रोलच होते. आताही कोणत्याही गोष्टीसाठी मला ट्रोल केले जाते तेव्हा आईला टेंशन येते. ती मला सतत हे लोक बघ काय बोलत आहेत तुझ्याबद्दल. मी तेव्हाही आईची समजूत काढली होती. आताही अनेकदा आईची समजूत काढतो.’
मराठी रंगभूमीपासून संतोषने करियरची सुरुवात केली
यानंतर 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेपासून त्याने सुरुवात केली.
ब्लाइंड गेम या सिनेमातून सोनेरी पडद्यावर पदार्पण केले
झेंडा आणि मोरया या सिनेमांनी त्याला ओळख मिळवून दिली
याशिवाय मुंबई मेरी जान, ब्लॅक होम, भोसले आणि छावा या हिंदी सिनेमातून त्याने अभिनयाची छाप पाडली.