

भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने काल म्हणजेच 18 जुलैला आपला 29 वा वाढदिवस साजरा केला. स्मृती अलीकडे चर्चेत होती ते तिच्या नव्या रेकॉर्डमुळे तिने भारतीय महिला वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त शतकं करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या वेळी स्मृतीला मिळणाऱ्या शुभेच्छांमध्ये सगळ्यात खास शुभेच्छा ठरल्या त्या बॉयफ्रेंड पलाश मुच्चलच्या. स्मृतीला बॉयफ्रेंड पलाशने क्युट अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी पलाश मुच्चल कोण आहे? काय करतो याबाबत सर्च केले. जाणून घेऊया पलाश यांच्याबद्दल
पलाश बॉलीवूड सिंगर पलक मुच्चल हिचा भाऊ आहे. त्याने अनेक गाणी गायली आहेतच पण सिनेनिर्माताही आहे. 2024 मध्ये त्याने ott प्लॅटफॉर्म जी 5 वर काम चालू है हा सिनेमा रिलीज केला आहे. ज्यामध्ये राजपाल यादव आणि जिया मानेक यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा त्याचा डायरेक्टोरियल डेब्यू मानला जातो. याशिवाय अभिषेक बच्चन आणि दीपिका यांची मुख्य भूमिका असलेला खेले हम जी जान से या सिनेमात त्याने कामही केले आहे.
अत्यंत कमी वयात पलाशचा संगीत क्षेत्रातील करियर सुरु झाले आहे. त्याच्या संपत्तीचा मुख्य स्त्रोत त्याचे संगीत प्रोजेक्ट आणि सिनेमातून आहे. पलाशची एकूण संपत्ती 20 ते 41 कोटीपर्यंत आहे. तर स्मृती वुमेन्स प्रीमियर लीगमधली सर्वात महागडी खेळाडू आहे. या लीगमध्ये तिची वर्थ 33.29 कोटी होती.
पलाश आणि स्मृतीने एकमेकांना सोशल मिडियावर कमेंट आणि रीप्लाय करणं सुरू केले तेव्हाच चाहत्यांनी त्यांच्या नात्याबाबत अंदाज बांधायला सुरुवात केली होती. मागील वर्षी पलाशने एका पोस्टमध्ये स्मृतीचा उल्लेख 'तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस' असा उल्लेख केला अन एकप्रकारे नात्यावर शिक्कामोर्तब केले. पलाशने बहीण पलक हिच्या उपस्थितीत एक रोमॅंटिक गाणे गात स्मृतीला प्रपोज केले होते.
एका कॅलेंडर वर्षात सगळ्यात जास्त शतक करण्याचा विक्रम स्मृतीच्या नावावर आहे. मागील वर्षी तिने चार शतके केली आहेत
टी 20 फॉरमॅटमध्ये 200 हून अधिक रन बनवणारी एकमेव भारतीय बॅट्समन आहे.
टी 20 फॉरमॅटमध्ये एका कॅलेंडर वर्षात स्मृतीने 100 पेक्षा जास्त चौकार मारण्याचा विक्रम केला आहे.
टी 20 आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान 4000 रन बनवणारी महिला क्रिकेटरचा सन्मानही स्मृतीच्या नावावर आहे.