Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळा लूक पाहिलात का?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क ; माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असतो. सध्या सचिन तेंडुलकरने आपल्या परिवारसोबत एका जवळच्या नातेवाईकाच्या विवाह संभारंभात हजेरी लावली. या  सोहळ्यात सचिन मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली. या विवाह समारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

मुंबईतील नातेवाईकाच्या लग्नाला सचिन तेंडुलकर याने आपल्‍या कुटुंबीयांसह  हजेरी लावली. या लग्नात खास करून सचिनची मुलगी साराचा मराठमोळा लूक चाहत्याच्या पाहायला मिळाला. यावेळी साराने निळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाच्या ब्लॉऊज परिधान केल्याने अप्रतिम दिसत होती. साडीसोबत कपालावर चंद्रकोर, नाकात नथ, केसांत गजरा, कपाळावर टिकली, साजेशीर दागिने, मेकअप आणि लाल रंगाच्या बांगड्यांनी तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.

विशेष म्हणजे, साराच्या ( Sara Tendulkar ) हातात कलश दिसतोय. यावरून ती या लग्नात करवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याआधी ती नेहमी वेस्टर्न लूकमध्ये दिसत होती. या लग्नात ती पहिल्यादांच मराठमोळ्या लूक पाहायला मिळतोय. साराचा हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

साराचे साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंटचा पाऊस पाडत आहे. याशिवाय सारा लग्नात पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नातेवाईकासोबत दिसली आहे. हा विवाह सोहळा मुंबईच्या जे डब्ल्यू हॉटेलमध्ये पार पडला. याशिवाय सारा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या इंन्टाग्रामवर नवनवीन हटके फोटो पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news