nora fatehi
nora fatehi

नोरा फतेही ऑरेंज ब्युटी!

Published on

पुढारी ऑनलाईन

एके काळी हीरोईनना नृत्य शिकवणारी नोरा फतेही स्वतःच एक अभिनेत्री झालेली आहे. तिचे सौंदर्य, अफलातून नृत्यकौशल्य व विशेषतः बेली डान्सचे अनेक दिवाने आहेत. तिचे अनेक फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत असतात. आताही तिचे नारंगी पोशाखातील फोटो व्हायरल झाले आहेत. या ऑरेंज ड्रेसला मॅच होणारे सोन्याचे दागिने तिने परिधान केले होते. 'डान्स दिवाने ज्युनिअर'च्या सेटबाहेर तिने या पोशाखात फोटोशूट केले. ती या शोमध्ये नितू कपूर आणि मार्झी पेस्तोनजी यांच्यासमवेत परीक्षकाच्या भूमिकेत आहे. मूळची कॅनडाची असलेली नोरा 'रोअर ः टायगर्स ऑफ सुंदरबन्स' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आली होती. हिंदीशिवाय तिने तेलगू, तामिळ व मल्याळी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनेक टी.व्ही. शोमधूनही ती झळकलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news