अभिनेत्री प्रणाली नांगरे-पाटील अडकली लग्नंबधनात | पुढारी

अभिनेत्री प्रणाली नांगरे-पाटील अडकली लग्नंबधनात

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री प्रणाली सध्या नांगरे-पाटील ही सुंदरी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय तिने घेतला वसा टाकू नको या मालिकेतून अभिनय साकारला होता. प्रणाली नांगरे-पाटील आता लग्नबंधनात अडकलीय. काही महिन्यांपूर्वीच प्रणाली आणि अनिकेत चव्हाण यांचा साखरपुडा पार पडला होता. प्रणालीने तिचे लग्नाचे आणि साखरपुड्याचे, हळदीचे फोटो शेअर केले आहेत.
प्रणालीच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली होती. मेहेंदीचा सोहळा पार पडल्यानंतर प्रणालीने हळदीचे फोटो शेअर केले होते. तिने लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिलीय की, असेच आयुष्यभर हासत खेळत जोडीने राहू.आणि येणाऱ्या संकटावर जोडीने मात करू.फक्त सुखात नव्हे तर दुःखात सुध्दा तेवढ्याच ताकतीने बरोबरीने उभे राहू.

आणखी एका फोटोत प्रणाली आणि अनिकेत मंगळसूत्र दाखवताना दिसत आहेत. प्रणालीने हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहे. त्यासोबत फोटोला कॅप्शन लिहिलीय की, हे कळवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, दि. १३.०५.२०२२. रोजी आमचे लग्न पार पडले. तुम्ही सर्वांनी आजवर दाखवलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्द्ल आम्ही अत्यंत आभारी आहोत. आणि आता आमच्या नवीन सुरू होणाऱ्या प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या सुंदर प्रवासासाठी तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो.

धन्यवाद…🙏 भरपूर प्रेम
प्रणाली आणि अनिकेत.

प्रणालीने खूप सारे हळदीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. त्याचसोबत तिचे मेहंदीचे फोटोदेखील पाहायला मिळतात.

हेदेखील वाचा-

Back to top button