

'धुरंधर' आणि 'धुरंधर २: द रिव्हेंज' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा अर्जुन हिने नुकतेच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वरचे दर्शन घेतले.
रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. हिंदी बेल्टमध्ये १,००० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या यशाची चर्चा होत असताना आता 'धुरंधर २' ची अभिनेत्री सारा अर्जुनची देखील चर्चा होतेय.
तिने उज्जैन येथे भेट दिली. येथील श्री महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिने पिंक कलरची साडी नेसली होती. खूप साधा मेकअप आणि चेहऱ्यावरील निरागसता फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. तिथे तिने भस्म आरती केली आणि देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. तिने याठिकाणी येऊन आनंद झाल्याचे सांगितले.
महाकालेश्वर मंदिरातील साराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आरती पूजेदरम्यान साराने एक साधी पिंक जांभळी शेड साडी नेसली होती. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ती म्हणाली, "माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला बोलावणं आलं आणि मग मी इथे आले. या जगात या भावनेपेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही."
सारा म्हणाली, "मी देवाकडे काही विशिष्ट काही मागितले नाही; मी फक्त उत्तम आरोग्य, संपत्ती आणि यशासाठी प्रार्थना केली. तो एक अद्भुत अनुभव होता आणि मी पूर्णपणे निःशब्द आहे. मी नुकतीच मंदिरातून बाहेर आले आहे आणि त्या अनुभवाने मी अजूनही भारावून गेले आहे."
'धुरंधर'मध्ये सारा अर्जुनची गाजली भूमिका
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने साराला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. याआधीही साराने अनेक दाक्षिणात्य चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. हिंदी व्यतिरिक्त साराने तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बालकलाकार म्हणून काम केलेली साराची चर्चा सगळीकडे आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' मध्ये सारा अर्जुनने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत. साराने या चित्रपटात हमजा अली मजारीच्या (रणवीर सिंग) पत्नीची (यालिना) भूमिका साकारली आहे.