

कपूर कुटुंबातील आणखी एक सदस्य आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. रणबीर कपूरची बहीण आणि ज्वेलरी डिझायनर रिद्धिमा कपूर साहनी 'दादी की शादी' या चित्रपटातून आपले अभिनय पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती तिची आई नीतू कपूर आणि प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यासोबत दिसणार आहे. आशिष आर. मोहन यांनी दिग्दर्शित केलेला हा एक फॅमिली ड्रामा आहे.
Kapil Sharma Daadi Ki Shaadi Movie Release Date
कॉमेडियन कपिल शर्माचा आगामी चित्रपट 'दादी की शादी' विषयी नवे अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांनी नवे पोस्टर जारी करत रिलीज डेटची घोषणा केलीय. खास बाब म्हणजे, कपिल शर्माच्या या चित्रपटातून रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर देखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट ‘खिलाडी ७८६’चे दिग्दर्शक आशीष आर मोहनने कपिल शर्माच्या 'दादी की शादी' चित्रपटाची घोषणा केलीय. रात्री उशीरा निर्मात्यांनी नवं पोस्टर रिलीज केलं आहे. यात कपिल शर्मा सोबत नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर देखील असतील.
चित्रपटगृहात कधी रिलीज होणार?
कपिल शर्माचा चित्रपट 'दादी की शादी' ८ मे, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे पोस्टर रिलीज होत आहे.
कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, आजी इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे आणि सर्व नियम मोडत आहे. तिचे कुटुंब तिच्यासोबत आहे की तिच्या विरोधात? 'ग्रँडमाज वेडिंग'मध्ये जाणून घ्या, जे ८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. जनरेशन डी पासून जनरेशन झेड पर्यंत सर्वांना आमंत्रित आहे.
रिद्धिमा कपूरचे बॉलीवूड डेब्यू
रिद्धिमा कपूर कपिल शर्माच्या या बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात करायला सज्ज आहे. सादिया खतीब देखील मुख्य भूमिकेत असेल.
याआधी कपिल शर्माचा चित्रपट 'किस-किसको प्यार करूं २' रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवली नाही. चित्रपटात आयशा खान, पारुल गुलाटी, त्रिधा चौधरी, मंजोत सिंह देखील मुख्य भूमिकेत दिसतील.