पुढारी ऑनलाईन :
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलं सारा अली खान आणि इब्राहिम यांचे गंमतीदार व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियात शेअर होत असतात. लॉकडाऊनच्या काळात तर साराने असे अनेक व्हिडीओ (तिच्या शीघ्रकवित्वाच्या झलकेसह) शेअर केले होते. आताही 'सिबलिंग्ज डे' म्हणजेच 'भावंडांचा दिवस'निमित्त साराने एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. साराने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिचा भाऊ इब्राहिम आणि आई अमृताही दिसत आहे. या तिघांचा हा मजेशीर व्हिडीओ सुमारे एक मिनिटाचा आहे. एखाद्या घरात भावा-बहिणीची जी दंगामस्ती, तक्रारी, गोड भांडणं सुरू असतात तसाच प्रकार सारा आणि इब्राहिमध्येही होत असतो. त्याचेच प्रतिबिंब या व्हिडीओतही दिसून येते.