

Sapna Choudhary dance show threat
मुंबई - हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सपना चौधरीच्या शोमध्ये मोठा गदारोळ झाला. छत्तीसगढच्या कोरबामध्ये एक स्टेज शो आयोजित करण्यात आला होता. जेव्हा फॅन्स स्टेजवर चढून नाचू लागले आणि पैसे फेकू लागले. जेव्हा सपना चौधरीने लोकांना स्टेज वरून उतरण्याची आणि पैसे फेकण्यास मनाई केली, तेव्हा दंगा सुरु झाला. परिस्थिती बिघडली तेव्हा सपना शो मधूनच सोडून रिसॉर्टमध्ये आपल्या खोलीत गेली. पण, काही जण तिच्या मागोमाग रिसॉर्टपर्यंत पोहोचले आणि खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयतन करू लागले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना १२ ऑक्तोबर, रविवार रात्री झाली. कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरू झाला आणि जवळपास अडीच तासानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गदारोळ सुरु झाला. रिसॉर्टच्या मॅनेजरने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत सांगण्यात आले की, काहींनी सपना आणि तिच्यासोबत आलेल्या लोकांना शिव्या दिल्या आणि गोळी घालण्याची धमकी दिली. शिवाय, रिसॉर्टमध्ये तोडफोड करून सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि १० हजार रुपये लूटून नेले.
पोलिसंच्या माहितीनुसार, मॅनेजरने अमित नवरंगलाल अग्रवाल, अनिल द्विवेदी, युगल शर्मा आणइ सुजल अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. अनिल द्विवेदीने दावा केली की, तो सपना चौधरीला शुभेच्छा देण्यासाठी गेला होता, त्यावेळी रिसॉर्टच्या स्टाफने त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली.