Agastya Nanda Debute Movie Ikkis : अगस्त्य नंदाचा 'इक्कीस'मधून दमदार लूक आऊट, 'कांतारा'शी सामना टळला; आता यादिवशी होणार रिलीज

Ikkis Movie Poster | अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा 'इक्कीस'मधून डेब्यू, पहिलाच दमदार लूक व्हायरल
image of Agastya Nanda
Agastya Nanda Debute Movie Ikkis new poster released Instagram
Published on
Updated on

Agastya Nanda Debute Movie Ikkis new poster

मुंबई - बॉलिवूडमध्ये नेपोटिझमच्या चर्चांमध्ये कायम चर्चेचा विषय असलेला, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करायला सज्ज आहे. तो आपल्या आगामी युद्ध चित्रपट “इक्कीस” (Ikkis)मधून चित्रपटाच्या दुनियेत पाऊल टाकणार आहे. निर्मात्यांनी नुकताच टीझर आणि पहिला लूक सार्वजनिक केला आहे. त्या लूकमध्ये अगस्त्य नंदा सैनिकाच्या वेशात दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरील तीव्र भाव आणि शौर्याची झलक स्पष्ट दिसतेय. युद्धभूमीचे दृश्य, धूर आणि धीरगंभीर भाव यामुळे तिचा दमदार लूक समोर आला आहे

अगस्त्य नंदाचा फर्स्ट लूक आऊट

अगस्त्यच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा आधीच करण्यात आली होती. इक्कीस चित्रपटातून अगस्त्य नंदाचे दोन पोस्टर जारी करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये तो हातात बंदूक घेऊन युद्धासाठी मैदानात उभा राहिलेला दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये सैन्याच्या वेषात आहे.

image of Agastya Nanda
Hardik Pandya love confession | हार्दिक पंड्या प्रेमाच्या रंगात, माहिका शर्मासोबत इन्स्टा स्टोरीत हातात हात

मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर इक्कीस चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलंय- "अरुण खेत्रपाल यांच्या जयंती दिनी, "इक्कीस", एक अशी कहाणी जी नेहमी आमच्या मनात राहील...दिनेश विजान - मैडॉक फिल्म्स प्रस्तुत करत आहेत श्रीराम राघवन द्वारा दिग्दर्शित #इक्कीस, परमवीर चक्र विजेते सर्वात कमी वयाच्या अधिकाऱ्या सत्य कहाणी. डिसेंबर २०२५ मध्ये चित्रपटगृहात!"या भूमिकेत असेल अगस्त्य नंदा

image of Agastya Nanda
Actor Raju Talikote Passes Away: प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे शूटिंगदरम्यान हार्ट ॲटॅकने निधन

'इक्कीस'ची कहानी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांची शूर कहाणी दाखवली जाईल. अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. अगस्त्य सोबत चित्रपटात धर्मेंद्र - जयदीप अहलावत देखील आहेत.

अगस्त्य नंदा यापूर्वी The Archies (2023)मध्ये दिसला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news