Santy Sharma: Bigg Boss 20 मध्ये रॅपर सेंटी शर्माची एन्ट्री? ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वक्तव्यामुळे आला होता चर्चेत

Santy Sharma Bigg Boss 20: बिग बॉस 20 च्या संभाव्य स्पर्धकांमध्ये रॅपर सेंटी शर्मा यांचे नाव चर्चेत आले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ संदर्भातील वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आला होता.
Santy Sharma Bigg Boss 20 CJP
Santy Sharma Bigg Boss 20 CJPPudhari
Published on
Updated on

Santy Sharma Bigg Boss 20: देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस’च्या 20व्या पर्वाची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये यंदा कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत विविध नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये आता रॅपर सेंटी शर्माचे नावही समोर आले आहे.

सेंटी शर्मा बिग बॉसमध्ये दिसणार?

मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील चर्चांनुसार, बिग बॉस 20 साठी निर्माते अनेक व्यक्तींशी संपर्क साधत आहेत. या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत रॅपर सेंटी शर्माचे नाव चर्चेत आले आहे.

मात्र, बिग बॉसचे निर्माते किंवा स्वतः सेंटी शर्माने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्याच्या सहभागाबाबत अद्याप केवळ तर्क-वितर्क सुरू आहेत.

शोची तयारी अंतिम टप्प्यात

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉस 20 च्या तयारीला वेग आला आहे. सलमान खान सप्टेंबर महिन्यात शोच्या शूटिंगला सुरुवात करू शकतो, अशी चर्चा आहे.

यंदाच्या सीझनमध्ये काही लोकप्रिय टीव्हीमधील चेहरे, सोशल मीडिया स्टार्स आणि इंटरनेट सेन्सेशन यांना संधी दिली जाऊ शकते. सेंटी शर्मा सोबत फैसल शेख, अंजली अरोरा, उर्फी जावेद आणि जन्नत जुबैर यांसारख्या नावांचीही चर्चा सुरू आहे.

सेंटी शर्मा चर्चेत का आहे?

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सेंटी शर्मा सोशल मीडियावर तेव्हा चर्चेत आला होता. त्याने सोशल मीडियावर स्पष्टपणे मत व्यक्त करत म्हणले होते की, लोकांनी कोणत्याही ट्रेंडचा भाग होण्यापूर्वी त्यामागील सत्य आणि उद्देश समजून घ्यावा. त्याने या संपूर्ण प्रकरणाला ‘इंटरनेट ड्रामा’ असे संबोधले होते. त्याच्या या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडक शैलीमुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.

Santy Sharma Bigg Boss 20 CJP
Consumer Rights: ‘पुष्पा 2’ पाहताना एसीच बंद! ग्राहक आयोगाचा थिएटरला दणका; प्रेक्षकाला 5 हजार देण्याचे आदेश

कोण आहे सेंटी शर्मा?

सेंटी शर्मा हा एक उदयोन्मुख रॅपर आणि संगीत कलाकार आहे.

  • सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

  • त्याच्या गाण्यांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • संगीतासोबतच सामाजिक आणि ट्रेंडिंग विषयांवर तो आपली स्पष्ट मतं मांडतो.

  • याच कारणामुळे त्याचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला आहे.

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सध्या सेंटी शर्मा बिग बॉस 20 मध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याच्या नावाची सुरू असलेली चर्चा आणि सोशल मीडियावरील लोकप्रियता पाहता, तो बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. आता चाहत्यांचे लक्ष बिग बॉस 20 च्या अधिकृत स्पर्धकांच्या यादीकडे लागले असून, त्यात सेंटी शर्माचे नाव आहे का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news