Ranveer Singh Big Decision|'Don 3 च्या वादानंतर रणवीर सिंहने घेतला मोठा निर्णय, १८ महिने हे काम अजिबात करणार नाही'

रणवीर सिंग बाळगणार मौन? 'डॉन 3' वादामुळे घेतला धक्कादायक निर्णय
ranveer singh
Ranveer Singh Big Decision amid 3 Don 3 controversy pudhari photo
Published on
Updated on
Summary

डॉन 3'मध्ये मुख्य भूमिका साकारत असलेल्या रणवीर सिंगने चित्रपटावरील वाद आणि सततच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पुढील 18 महिने मुलाखती न देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या काळात तो केवळ आपल्या चित्रपटांवर आणि व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले जात आहे.

'डॉन ३' चित्रपटाबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि तर्कवितर्कांच्या दरम्यान, रणवीर सिंगने या विषयावर पूर्णपणे मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनेत्याची प्रत्यक्ष भेट झाल्याचा दावा करणाऱ्या एका 'ट्रेड जर्नलिस्ट'च्या मते, रणवीरचा या वादावर सार्वजनिकपणे चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही आणि पुढील १८ महिने तो प्रसारमाध्यमांना कोणतीही मुलाखत देण्याची शक्यता नाही.

ranveer singh
Welcome To the Jungle| ‘वेलकम टू द जंगल’मधील ‘दीवाने हैं’ गाण्याची जादू; अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा?

विशेष म्हणजे, या प्रोजेक्टबाबत रणवीर किंवा त्याची पीआर टीमने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील पोर्टलवर व्हायरल झालेली बरीचशी माहिती ही केवळ पडताळणी न झालेली चर्चा आहे.

ranveer singh
Samantha Prabhu |''तुमचे आयुष्य स्वप्नांपेक्षाही भव्य असू शकतं”; सामंथाची मुख्यमंत्री विजय यांच्यासाठी खास पोस्ट व्हायरल

'डॉन ३' मधून बाहेर पडण्याच्या चर्चेदरम्यान, रणवीरने शांत राहणे पसंत केले आहे. त्याच्या टीमने याआधी एक निवेदन जारी करून सांगितले होते की, तो या वादावर सार्वजनिकपणे भाष्य करणार नाही.

रणवीर सिंहे देणार नाही मुलाखत

रिपोर्टनुसार, रणवीर डॉन ३ या चित्रपटाशी संबंधित कुठल्याही मुलाखत, चर्चेपासून दूर राहणार आङे.कुठल्हायाही प्रसारमाध्यमांना १८ महिन्यांसाठी मुलाखती दिल्या जाणार नाहीत. दरम्यान, जय मेहता यांच्या 'प्रलय' (Pralay) या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत तो संवाद साधणेही टाळणार आहे.

प्रलय चित्रपटाबद्दल-

हा चित्रपट दिग्दर्शक जय मेहता (हंसल मेहता यांचे पुत्र) दिग्दर्शित करत आहेत. हा त्यांचा मोठा फीचर-फिल्म दिग्दर्शन प्रकल्प मानला जात आहे. अपोकॅलिप्टिक झॉम्बी थ्रिलर (प्रलयानंतरच्या जगावर आधारित झॉम्बी कथा) असा असल्याचे वृत्त समोर आले आहे.

कथानक मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडत असल्याचे सांगितले जाते आणि उद्ध्वस्त शहर दाखवण्यासाठी VFX/AI-आधारित दृश्य तंत्रज्ञान वापरल्याची चर्चा आहे. रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असेल. वृत्तांनुसार, अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनचीदेखील महत्त्वाच्या भूमिका असेल. चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याचे निर्मात्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे. अधिकृत रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news