Sanju Samson : याला म्हणतात 'जबरा' फॅन! संजू सॅमसनने रजनीकांतच्या 'जेलर २'साठी थेट संपूर्ण थिएटरच केलं बुक!

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संघातील सहकाऱ्यांबरोबर चित्रपट पाहणार

Sanju Samson Jailer 2 theater booking
भारतीय स्टार क्रिकेटर संजू सॅमसनने रजनीकांत यांच्‍या 'जेलर २' चित्रपटासाठी चक्‍क संपूर्ण थिएटरच बूक केले आहे. Pudhari news
Published on: 
Updated on: 

Sanju Samson Jailer 2 theater booking : दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार्सना मिळणाऱ्या चाहत्‍यांच्‍या प्रेमाची तुलना जगात कशाशीच होऊ शकत नाही. यामध्‍ये अग्रस्‍थानी नाव आहे 'थलायवा' रजनीकांत यांचे. त्‍यांचे नाव उच्चारताच पडद्यावर त्यांची एक झलक पाहताच थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडतो! रजनीकांत यांच्या या अभूतपूर्व क्रेझचे शिकार केवळ सर्वसामान्य नागरिकच नाहीत, तर क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज सेलिब्रिटीही आहेत. असाच रजनीकांत यांचा एक 'डाय हार्ड फॅन' आहे भारतीय स्टार क्रिकेटर संजू सॅमसन! त्‍याने रजनीकांत यांच्‍या नाव चित्रपट 'जेलर २'साठी चक्‍क संपूर्ण थिएटरच बूक केले आहे.

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संघातील सहकाऱ्यांबरोबर चित्रपट पाहणार

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संघातील सहकाऱ्यांसोबत हा सिनेमा पाहता यावा, यासाठी सॅमसनने संपूर्ण थिएटरचा एक शोच बुक केला आहे. याबाबत बोलताना संजू सॅमसन म्हणाला, "मला रजनी सरांचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. मी नेहमीच त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतो. जेलर २ हा चित्रपट मी रिलीजच्या दिवशी पाहू शकलो नाही, कारण आमचा दिल्लीत एक कार्यक्रम होता. त्यामुळे मी एक दिवस उशिरा पाहत आहे. मी त्यांचे जास्तीत जास्त चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतो."


Sanju Samson Jailer 2 theater booking
Sanju Samson IND vs AFG: दुष्काळ संपवला, वैभववरही बोलला; कधी कधी Wi-Fi ऑन होतं अन्... संजूची माईकवरही फटकेबाजी

आज सुदैवाने संपूर्ण थिएटर बुक करता आले

"आज सुदैवाने संपूर्ण थिएटर बुक करता आले. मी माझ्या मित्रांना आमंत्रित केले आहे आणि माझी पत्नीही सोबत आहे. मोठ्या पडद्यावर रजनी सरळ बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतीय संघातील तमिळ भाषा समजणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तया शोसाठी आपल्यासोबत येणार असल्याचा खुलासाही सॅमसनने केला. संघातले तमिळ कळते, ते सगळेच सिनेमा पाहायला येत आहेत," असेही त्याने स्पष्ट केले.


Sanju Samson Jailer 2 theater booking
Sanju Samson MS Dhoni Video: नशीब मला इथं घेऊन आलंय अन्... जेव्हा CSK ची लेगसी अन् भविष्याची होते भेट! खास व्हिडिओ

'जेलर २' ची कमाई २४२.२५ कोटी पार

दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांचा 'जेलर २' हा २०२३ मधील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जेलर' चित्रपटाचा सीक्वल आहे. वीकेंडच्या तुलनेत सोमवारी चित्रपटाच्या कमाईत किंचित घट झाली असली, तरी थिएटर्समधील या चित्रपटाची जादू कायम आहे. 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) अहवालानुसार, या एक्शन-थ्रिलर चित्रपटाने १९ ऑक्टोबर रोजी देशभरात तब्बल १५,२१५ शोच्या माध्यमातून ४२.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशभरात एकुण कमाई २४२.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर देशांतर्गत एकूण कमाई २८३.७५ कोटी रुपयांवर गेली आहे. सोमवारी झालेल्या एकूण कमाईमध्ये प्रामुख्याने तमीळ आवृत्तीचा वाटा सर्वाधिक होता, याशिवाय तेलुगू, हिंदी आणि कन्नड भाषांमधूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई आता ४७७.७५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news