Sanju Rathod New Song | गुलाबी साडी..., शेकी फेम संजू राठोडचं नवीन गाणं ऐकलंत का?

Sanju Rathod New Song | गुलाबी साडी..., शेकी फेम संजू राठोडचं नवीन गाणं ऐकलंत का?
image of Sanju Rathod
Sanju Rathod New Song released sanjurathod_fanclub Instagram
Published on
Updated on

Sanju Rathod New Song pillu released

मुंबई - गायक संजू राठोडचं 'एक नंबर तुझी कंबर..चाल शेकी शेकी' गाण्यानंतर नवं गाणं भेटीला आलं आहे. जीएमई म्युझिक प्रस्तुत “पिल्लू” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला असून या गाण्याची क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळतेय.

गुलाबी साडी आणि शेकी गाणे तुफान गाजले. या गाण्यांच्या यशानंतर गायक संजू राठोडचे पिल्लू गाणे प्रदर्शित झाले आहे. निर्मिती श्रीनाथ कोडग आणि चेतन चव्हाण यांनी तर या दिग्दर्शन अभिजीत दाणीने केलं आहे. गाण्यात संजू राठोड आणि सेजल नायकरे यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळेल. गाण्याचं संगीत दिग्दर्शन जी-स्पार्कने केलं आहे तर गाणं संजू राठोड आणि मयुरी हरिमकर यांनी गायलं आहे. पिल्लू गाण्याच्या गीतरचना संजू राठोडने केले आहे.

नव्या गाण्याबद्दल संजू राठोड काय म्हणाला?

संजू राठोड म्हणाला, ''पिल्लू गाणं मी स्वतः लिहिल असून याचं कम्पोझिशन मी स्वतः केलं आहे. हे गाणं माझ्या फार जवळच आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही माझ्या गुलाबी साडी आणि शेकी गाण्यांना जस प्रेम दिलत तसच प्रेम पिल्लू गाण्याला देखील द्या.''

image of Sanju Rathod
WAR 2 Aavan Jaavan Song | “हा सिनेमातला बेस्ट रोमँटिक मोमेंट!” हृतिक रोशन-कियाराचे गाणे पाहाच

दिग्दर्शक अभिजीत दाणी म्हणाले, “पिल्लू गाणं नाशिक येथील घोटी भागातील दौंडत गावात झालं आहे. या गावात नयनरम्य ठिकाणं आहेत. परंतु येथे बिबट्यांचा वावर देखील आहे. त्या गावातील गावकऱ्यांनी आम्हाला सांभाळून शूट करा, असं सांगितल होतं. हे गाव नाशिक शहरापासून दूर आहे. आमचा प्रोडक्शन मॅनेजर नाशिक सिटीमधून काही सामान आणायला गेला होता, तेव्हा त्यांच्या गाडीसमोरून बिबट्या आडवा गेला. तेव्हा ते सेटवर आले आणि त्यांनी हा किस्सा सांगितला. तेव्हा आम्ही सगळे घाबरलो होतो. परंतु टीमने खूप सपोर्ट केला. सगळ्यांनी न घाबरता शूट पूर्ण केले.”

शूटिंगवेळी संजू राठोडला झाली ॲलर्जी

पिल्लू गाण्याच्या शूटिंगवेळी संजूला धुळीची ॲलर्जी झाली होती. त्याचे ओठ आणि डोळे सुजले होते. त्याला त्वरित डॉक्टरकडे नेलं. तब्बल ५ तासानंतर त्याची सूज उतरली आणि आम्ही फर्स्ट टेक घेतला. हे गाणं शूट करताना खूप चॅलेंजेस आले.

image of Sanju Rathod
Subodh Bhave-Rinku Rajguru | ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील पहिलं गाणं; सुबोध-रिंकूच्या नात्याची झलक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news