सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅन्स याबाबतचे भन्नाट किस्से अनेहमीच ऐकायला आणि वाचायला मिळतात. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी चाहते अनेकदा आश्चर्य वाटेल इतके प्रेम व्यक्त करतात. असेच काहीसे घडले आहे संजय दत्त सोबत. काहीसा बेफिकीर आणि बिनधास्त याशिवाय इतर स्टारकीडपेक्षा काही वेगळा भूतकाळ असणाऱ्या संजूबाबाचे निंदक आहेत त्याहीपेक्षा जास्त प्रशंसक आहेत. (Latest Entertainment News)
संजयच्या एका चाहतीचे 2018 मध्ये निधन झाले. यानंतर तिने तिची 72 कोटींची संपत्ती अभिनेता संजय दत्त याच्या नावावर केल्याची बातमी समोर आली होती. अनेक लोकांना ही बातमी फेक असल्याचे वाटत होते. पण अलीकडेच एका मुलाखतीमध्ये संजयने याचा खुलासा केला आहे.
या मुलाखतीमध्ये संजयला विचारले गेले की खरंच त्या चाहतीने त्याच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केली होती का? त्यावेळी संजयने होकार देत सांगितले होते की हे खरे आहे. पुढे या संपत्तीचे काय केले आहे याचा खुलासाही केला आहे. संजय म्हणतो, मी ती संपत्ति त्या कुटुंबाला परत केली आहे. संजयच्या या कृतीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
62 वर्षीय निशा पाटील नावाची संजय दत्तची चाहती एका असाध्य आजाराने पीडित होती. आपल्या मृत्यूपूर्वी निशाने आपली सर्व संपत्ति संजय दत्तला देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
संजय दत्त रणवीर सिंहसह आता आगामी धुरंधर या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तो बागी 4, तेलुगू सिनेमा राजासाब, वेलकम टू द जंगल या सिनेमात दिसणार आहे.