

अभिनेता करण कुंद्रा आणि युट्यूबर एल्विश यादव यांनी लाफ्टर शेफ्सचा दूसरा सीझन जिंकला आहे. कॉमेडी आणि कुकिंग ही संकल्पना घेऊन समोर आलेल्या या शोच्या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला. कलर्स टीव्हीच्या पेजवर या विजेत्यांचा फोटो शेयर केला आहे. यामध्ये हे दोघेही आपापल्या ट्रॉफीसोबत दिसत आहेत. या शोचे जज हरपालसिंग सोखी यांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Entertainment News)
करण कुंद्राने आपल्या विजयावर आनंद व्यक्त करताना म्हणले आहे, सीझन 2 चा भाग असणे माझ्यासाठी एक खास अनुभव होता. या सेटवर एक सहजपणा होता. केवळ आनंद घेण्याच्या दृष्टीने आम्ही हे शूट केले. मी सीझनमध्ये ऐन भरात असताना आलो. यासाठी माझी काहीही तयारी नव्हती. पण हे परत येणे मला कुटुंबात घरी असल्यासारखे वाटते. या ठिकाणी एल्विशसोबत हाय टेंशन किचनमध्ये काम करणे एक वेगळाच अनुभव होता.या प्रवासातील माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील केलेल्या धमाल सहित हा संदेश की कोणीही स्वयंपाक करू शकतो आणि करायलाच हवा. कारण जेवण केवळ परफेक्शन नाही तर ते एक कनेक्शन आहे.
तर या विजयाबाबत एल्विश म्हणतो, मी जेव्हा लाफ्टर शेफमध्ये आलो तेव्हा ती एक मजेदार सहल असल्यासारखेच वाटले होते. थोडी धमाल किचनमधील गोंधळ आणि आता पुन्हा नेहमीच्या आयुष्यात परत. करणसोबत आल्याने माझी आणि त्याची वाईब एकदम मॅच झाली. आम्ही धमाल केली आणि जसे आहोत तसेच सगळ्यांना सामोरे गेलो. या प्रवासाने मला खूप काही शिकवले.
शोची होस्ट भारती सिंगने आपल्या खुसखुशीत निवेदन शैलीत शोमध्ये रंग भरले. तर शेफ हरपाल सिंग सोखी यांनी यांनी या सीझनचे जज म्हणून काम पहिले.
या सीझनचा प्रीमियर 1 जून 2024 ला झाला होता. पहिल्या सीझनमध्ये अली गोणी आणि राहुल वैद्यने लाफ्टर शेफचा किताब जिंकला होता.