

सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सध्या चर्चेत आहे. संगीताच्या फार्महाऊसवर अलीकडेच चोरी झाली होती. संगीता त्या फार्महाऊसवर जवळपास 20 वर्षे राहते आहे. संगीताने पुणे ग्रामीण पोलिसचे अधीक्षक संदीप सिंह गिल यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. तिने यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्याचा परवाना मागितला आहे. (Latest Entertainment News)
ती चोरीबाबत बोलताना म्हणते, ‘ मी एसपी संदीप सिंह यांची भेट घेतली. मी त्यांना भेटण्यासाठी खास पुण्याला आले आहे. त्यांना भेटून लवकरात लवकर तपास करण्याची मागणी केली आहे. कारण माझ्या घरात चोरी झाली आहे. मी स्वत:च्या घरातच असुरक्षित समजते आहे. मी तिथे 20 वर्षांपासून राहते आहे. पण मला माझ्याच घरात भीती वाटत आहे.
गेले चार महीने संगीता या फार्महाऊसपासून लांब होती. 18 जुलैला जेव्हा ती या फार्महाऊसवर पोहोचली त्यावेळी घरी चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. चोर घरच्या मागच्या दाराने घरात घुसले. पहिल्या मजल्यावरून 50,000 रुपयांची रोकड, 7000 किमतीचा एक टीव्ही सेट हे होते. अशाप्रकारे 57,000 रुपयेची चोरी झाली आहे.
घरच्या भिंतीवर अश्लील वाक्ये लिहिली होती. अनेक मौल्यवान सामानही गायब होते. cctv कॅमेरेही तोडले होते. या घटनेला साडे तीन महीने झाले. पण अजून काहीच धागेदोरे हाती लागले नाही.
संगीता सांगते, या घटनेनंतर मी पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदूक परवान्याची मागणी केली आहे. एक महिला असल्याने मी एकटी घरी जाते तेव्हा मला सुरक्षित वाटण्याची गरज आहे. मला बंदूकीचे लायसन्स घेण्याची गरज कधी वाटली नाही पण आता या घटनेनंतर ती वाटू लागली आहे.’