

कौन बनेगा करोडपती या शोने देशभरात स्वत:चे खास स्थान निर्माण केले आहे. जवळपास प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या खास निवेदनशैलीने आणि खुसखुशीत संवादाने हा शो प्रेक्षकांना अधिकच मनात भरतो. (Latest Entertainment News)
पण नुकताच या शोच्या लेटेस्ट एपिसोडने खळबळ उडवली आहे. या शोमध्ये गुजरातच्या गांधीनगरचा इयत्ता पाचवीचा ईशीत भट्ट सहभागी झाला होता. पण त्याच्या बोलण्याच्या पद्धतीने, आणि अॅटीट्यूडने तो ट्रोल होतो आहे. त्या एपिसोडची लिंक व्हायरल होताच अनेकांनी त्याचे बोलणे असभ्य आणि अपमानजनक असल्याचे सांगितले.
या संवादादरम्यान बोलताना ईशीत अमिताभ याना म्हणतो, 'अरे सर तुमचे तोंड नाही उत्तर लॉक करा.’ केवळ त्याचा अॅटीट्यूडच नाही तर त्याचा टोनही अनेक प्रेक्षकांना अस्वस्थ करत होता. पुढे तो म्हणतो, ‘मला नियम वैगेरे काही सांगू नका, मला सगळे माहिती आहे.’ तसेच तो पुढे बिग बी यांना म्हणतो, 'बिग बी अंकल तुम्ही चुकताच की!’ अर्थात इतका अॅटीट्यूड दाखवणारा ईशीत काही खास रक्कम न जिंकताच शोमधून निघून गेला.
या एपिसोडमधील त्या मुलांची वर्तणूक पाहून यूजर चांगलेच भडकले आहेत. ‘याचा शेवट खूपच चांगला झाला आहे. मी या मुलाबाबत नाही तर त्याच्या आई-वडिलांबाबत बोलते आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना विनम्रता, शिष्टाचार नाई शिकवू शकत तर ते कोरडे आणि अतिआत्मविश्वासी बनत जातात. एक रुपयाही न जिंकणे या लोकांना खूप काळ त्रास देत राहील.’ एकजण म्हणतो, या ठिकाणी माझी आई असती तर आतापर्यंत मला 4 कानाखाली लावले असते.’
बिग बी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘ काही सांगण्यासारखे नाही. फक्त स्तब्ध आहे.’ यावर नेटीझन्स म्हणतात, ‘ अशी मुले स्पर्धक म्हणून आली तर स्तब्धच व्हावे लागेल सर.’ तर दुसरा म्हणतो, ‘सर तुम्ही या मुलांना भुतानाथचे रूप दाखवायला पाहिजे होते.’