

Co-Star Ujjwal Sharma Harassed Her Mentally Over Money Dispute
'कुमकुम भाग्य' या मालिकेतील भूमिकेसाठी ओळखल्या जाणारी टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेने १४ जून रोजी नालासोपारा येथील राहत्या घरी आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री इंद्राक्षी कांजीलालने काही नवीन दावे केले आहेत. एका वेबसाईटशी बोलताना इंद्राक्षीने आरोप केला की, संचिताला 'साजन घर' या मालिकेतील तिचे सह-कलाकार उज्ज्वल शर्माकडून मानसिक छळाचा सामना करावा लागत होता.
संचिता उगले यांचा मृत्यू आणि मानसिक छळ
'कुमकुम भाग्य' या मालिकेतील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले यांनी १४ जून रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. त्या अवघ्या २२ वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, घरी एकटी असताना संध्याकाळी ७ च्या सुमारास त्या मृत अवस्थेत आढळल्या. त्यांच्या अचानक निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्र आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय म्हणाली इंद्राक्षी?
इंद्राक्षी यांनी दावा केला की, उज्ज्वलने संचिताकडून पैसे उसने घेतले होते आणि नंतर ते परत करण्यास नकार दिला. तिने पुढे आरोप केला की, जेव्हा संचिताने तिचे पैसे परत मागितले, तेव्हा त्याने उद्धटपणे वागून तिचा अपमान केला. "उज्ज्वलने संचिताकडून पैसे घेतले होते आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन केले. जेव्हा तिने पैसे परत मागितले, तेव्हा त्याने संताप व्यक्त केला. तिचा अपमान केला आणि तिला मारण्याची धमकीही दिली."
तिने पुढे सांगितले की, त्यांच्याकडे संभाषणाचे चॅट्सचे पुरावा म्हणून उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तथाकथित अयोग्य भाषेचा वापर केला होता. इंद्राक्षीने हेदेखील आरोप केले की, एकत्र काम करत असताना संचिताला मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते. संचिताने याबद्दल मालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. संचिताला शेवटी लक्षात आले की, हे काहीही बदलणार नाही, म्हणूनच तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
इंद्राक्षी म्हणाली, "संचिताने मला सांगितले होते की आरोग्याच्या कारणास्तव ती शो सोडत आहे. मात्र, जेव्हा मी तिला त्याबद्दल विचारले, तेव्हा तिने सांगितले की, उज्ज्वल शर्मा तिला मानसिक त्रास देत होता. तिने मला त्यासंबंधीचे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ दाखवले. मला तिची खूप दया आली कारण मी स्वतः माझ्या आधीच्या शोमध्ये अशाच अनुभवातून गेले होते. मी तिला याबद्दल प्रॉडक्शन टीमला सांगायला सांगितले, पण तिने सांगितले की तिने दिग्दर्शकाला आधीच सांगितले आहे. पण काहीच कारवाई झाली नाही."
इंद्राक्षीने उज्ज्वल आणि संचिता यांच्यातील वादाबद्दल सांगितले- उज्ज्वल पैसे देत नव्ह, शिवाय त्याच्या मानसिक छळामुळे संचिता डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला शो सोडायचा नव्हता, पण त्या छळामुळे तसे करावे लागले.
इंद्राक्षी म्हणाली, "आम्ही पहिल्यांदा एका मालिकेच्या 'मॉक शूट'साठी भेटलो होतो. ती मालिका नंतर रद्द करण्यात आली होती. तिथेच आमचे ट्युनिंग चांगले जमले, त्यामुळे आम्ही अधिक बोलू लागलो. मी कोरियामध्ये असताना तिला 'साजन घर' ही मालिका मिळाली. मी तिचे अभिनंदन केले आणि त्या मालिकेत काम करताना ती खरोखरच खूप आनंदी होती. या वर्षी जेव्हा मी कोरियाहून परतले, तेव्हा आम्ही लवकरच भेटण्याचे ठरवत होतो; ती खूप बिझी होती आणि काही समस्यांमधूनही जात होती, पण त्याबद्दल आम्ही फारसे बोललो नाही. दोन महिन्यांनंतर, मला एक 'कास्टिंग कॉल' आला कारण ते 'साजन घर'साठी नवीन मुख्य अभिनेत्रीच्या शोधात होते; मला गोंधळल्यासारखे वाटले आणि मी लगेच संचिताला मेसेज केला."
संचिता होती आशावादी
इंद्राक्षीने सांगितले की, संचिता आपल्या भविष्याबद्दल किती आशावादी होती. शेवटच्या कॉलमध्ये तिने सांगितले होते की, ती महाबळेश्वरच्या सहलीला जाणार होती आणि परत आल्यावर ऑडिशन्स सुरू करणार होती. गेल्या आठवड्यात ती दुःखी आणि अस्वस्थ वाटत होती, म्हणून मी तिला माझ्या घरी यायला सांगितले होते. पण ती घराबाहेर पडली नाही.