Samsara Movie Teaser | सायली संजीव, ऋषी सक्सेनाच्या 'समसारा' चित्रपटाचा टीजर लाँच

sayali sanjeev - Rishi Saxena movie Teaser | ''समसारा'चं गूढ २० जूनला उकलणार
image of Samsara Movie poster
Samsara Movie teaser launch Instagram
Published on
Updated on

sayali sanjeev - Rishi Saxena Samsara Movie Teaser

मुंबई - हॉरर चित्रपट हा जगभरात लोकप्रिय असलेला प्रकार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रकार फार हाताळला गेलेला नाही. ही उणीव आता "समसारा" हा चित्रपट भरून काढणार असून, दमदार स्टारकास्ट या चित्रपटाचा गूढरम्य टीजर लाँच नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. २० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश गुप्ता यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. कथा सागर लढे, विश्वेश वैद्य आणि समीर मानेकर यांची असून, पटकथा सागर लढे आणि समीर मानेकर यांनी लिहिली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.

image of Samsara Movie poster
Prachi Pisat-Sudesh Mhashilkar | 'तुझा नंबर पाठव ना, 'तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय..' प्रसिद्ध अभिनेत्याचे प्राची पिसाटला अश्लील मेसेज
image of actress sayali sanjeev
Instagram

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट "समसारा" हा चित्रपटात उलगडण्यात आली आहे. गूढरम्य गोष्टीला अनुभवी अभिनेत्यांची साथ लाभली आहे. त्याशिवाय पार्श्वसंगीत, छायांकन, व्हिज्युअल इफेक्ट्सही उत्तम दर्जाचे असल्याचं टीजरमधून जाणवतं आहे. त्यामुळेच चित्रपटाचा टीजर अत्यंत रंजक आणि भयाचा अनुभव देणारा ठरला आहे.

image of Samsara Movie poster
Dino Morea | डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी, तब्बल ६५ कोटींचा मीठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण

मराठी चित्रपटांत हॉरर प्रकार फारसा हाताळला गेलेला नसल्यानं समसारा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळेच समसाराचं नेमकं गूढ काय आहे, या विषयी आता कुतूहल निर्माण झालं आहे. मात्र, त्यासाठी २० जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तसंच चित्रपटगृहातच अनुभव घ्यावा असा हा चित्रपट असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news