Dino Morea | डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी, तब्बल ६५ कोटींचा मीठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण

Dino Morea Mithi River cleaning scam | आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता डीनो मोरिया आणि त्याच्या भावाची चौकशी सुरु आहे
image of actor Dino Morea
Mithi River cleaning scam Dino Morea and brother is being questioned by EOW Instagram
Published on
Updated on

Mithi River cleaning scam Dino-brother questioned by EOW Mumbai Police

मुंबई - मीठी नदी गाळ उपसा प्रकरणी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांची आर्थ‍िक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात त्याच्या भावाचे नाव देखील असून त्याचीही चौकशी सुरु आहे. आज आर्थिक गुन्हे शाखेच्या मुंबई पोलिस आयुक्तालयातील कार्यालयात ही चौकसी सुरु असल्याची माहिती मिळाली. मुख्‍य आरोपी केतन कदमच्या फोनमधून ड‍िनो आणि त्याचा बाऊ सँटिनोचे नाव मिळाल्याचे समजते.

image of actor Dino Morea
Happy Birthday Dilip Joshi | ‘तारक मेहता…’चे जेठालाल खासगी आयुष्यात आहेत तरी कसे? ट्रॅव्हल एजन्सी ते अभिनेता कसा आहे प्रवास

तब्बल ६५ कोटींच्या घोटाळा प्रकरणात त्याला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यामध्ये त्याचा भाऊ सँटिनोला देखील बोलावण्यात आलं होतं. या प्रकरणाचा मुख्य आरोपी केतन कदमशी दोघांनी फोनवर अनेकदा बातचीत केल्याचे समोर आले आहे.

image of actor Dino Morea
Khotachi wadi | 'सुहास जोशी' नव्या भूमिकेत, 'खोताची वाडी' मधील पहिला लूक चर्चेत!

केतन कदमच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये ड‍िनो - सँटिनोचे नाव

केतन कदमच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये ड‍िनो - सँटिनोचे नाव असून त्यांच्यातील बातचीतचा देखील गुन्हे शाखेने तपास केला. कॉल रेकॉर्ड शिवाय तपासादरम्यान, आर्थिक व्यवहारासंबंधित डिनोची चौकशी झाली. केतन आणि अन्य पार्टीच्या डील विषयी डिनो मोरियाला माहिती होती? जर यामध्ये नवी माहीती किंवा खुलसे झाले तर अधिकारी अधिक तपास वाढवतील.

काय आहे मीठी नदी घोटाळा?

मीठी नदी घोटाळा प्रकरमात केतन कदम आणि जय जोशी मुख्‍य आरोपी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा घोटाळा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) नदी खोदकाम यंत्रे आणि उपकरणांच्या भाड्यात केलेल्या कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. काही आठवड्यांपूर्वी, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील दोन आरोपी केतन कदम आणि जयेश जोशी यांना अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news