

Prachi Pisat on Sudesh Mhashilkar
मुंबई - झगमगत्या दुनियेत काही जण असे असतात की, ज्यामुळे खरंच विचित्र त्रासाला सामोरं जावं लागतं. मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्यासोबत देखील एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी 'तू चालं पुढे' फेम अभिनेत्री प्राची पिसाटला सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप तिने केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले असून तिने सांगितले की, सुदेश तिला वारंवार मेसेज करून त्रास देत होते. याचा पुरावा म्हणून तिने मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले.
या आरोपांवर मात्र अद्याप सुदेश म्हशीलकर यांवी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुदेश म्हशीलकर "कोण होतीस तू काय झालीस तू " मालिकेत श्रीकांत धर्माधिकारीं ही भूमिका साकारत आहेत. तर झी मराठीवरील 'तू चालं पुढे' या मालिकेत प्राची पिसाटने ताराची भूमिका साकारली होती. नुकताच तिच्याबाबतील हा प्रकार घडला आहे.
अभिनेत्री प्राची हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही ॲक्टीव्ह असते. नुकताच प्राचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय, ज्यामुळे तिच्यासोबत घडलेला विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राची पिसाटनं प्रसिद्ध अभिनेता सुदेश म्हशीलकर यांनी तिला फेसबुक केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत तिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी फेसबूकवर केलेल्या मेसेजचे स्क्रीन शॉट अपलोड केले आहेत.
प्राचीनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली... बायकोचा नंबर असलेच... ती ही गोड आहे... बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का... ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरीनंबर मिळवशील आणि कॉल करशीलच'.
प्राचीने कॅप्शनमध्ये लिहिलंय - 'इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते...'