Samantha Ruth Prabhu : प्रेग्नन्सीदरम्यानही सामंथाने थांबवले नाही शूटिंग; मॉर्निंग सिकनेस असूनही केला एनर्जेटिक गाण्याचा शूट, दिग्दर्शिकेचा खुलासा

चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांनी सामंथाविषयी एक धक्कादायक पण प्रेरणादायी खुलासा केला आहे.
Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu : प्रेग्नन्सीदरम्यानही सामंथाने थांबवले नाही शूटिंग; मॉर्निंग सिकनेस असूनही केला एनर्जेटिक गाण्याचा शूट, दिग्दर्शिकेचा खुलासाfile photo
Published on
Updated on

Samantha didn't stop shooting even during pregnancy; she filmed an energetic song despite morning sickness, reveals the director

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या 'मा इंटी बंगाराम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचबरोबर तिने चाहत्यांसोबत तिच्या प्रेग्नन्सीची आनंदाची बातमीही शेअर केली असून, त्यानंतर तिच्याविषयीची चर्चा आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या एका कार्यक्रमात सामंथाने आपण लवकरच छोटासा मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचे सांगितले होते.

Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu | पहिल्या अपत्याची चाहूल! अभिनयातून काही काळ विश्रांती, सामंथाच्या मॅटर्निटी ब्रेकची चर्चा

आता या चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी यांनी सामंथाविषयी एक धक्कादायक पण प्रेरणादायी खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रेग्नन्सीमुळे तब्येत बरी नसतानाही सामंथाने शूटिंग सुरू ठेवले आणि अत्यंत उत्साहाने काम पूर्ण केले.

एका मुलाखतीत नंदिनी रेड्डी यांनी सांगितले की, 'थस्सादिया' या ऊर्जावान गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांना सामंथाच्या प्रेग्नन्सीची माहिती मिळाली. त्या म्हणाल्या, "ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. सुरुवातीला आम्हाला फक्त एवढेच सांगण्यात आले होते की सामंथाची सकाळी तब्येत ठीक नव्हती. आम्हाला वाटले तिला कदाचित ताप आला असावा."

Samantha Ruth Prabhu
Samantha ruth Prabhu |सामंथाने दिली Good News? व्हाईट बॉडी फिट टॉपमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट

पुढच्या दिवशी त्यांनी सामंथाला तिच्या प्रकृतीबद्दल विचारले असता, सुरुवातीला तिने काही सांगितले नाही. मात्र, काही वेळाने तिने आपण गर्भवती असल्याचे आणि मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असल्याचे सांगितले. नंदिनी यांच्या मते, तो तिच्या प्रेग्नन्सीचा सुरुवातीचा काळ होता. त्यानंतर संपूर्ण चित्रपट युनिटने शूटिंगदरम्यान तिची विशेष काळजी घेतली. सुदैवाने, चित्रपटातील सर्व अॅक्शन सीक्वेन्स याआधीच पूर्ण झाले होते.

'थस्सादिया' हे 'मा इंटी बंगाराम' चित्रपटातील लग्नसोहळ्यावर आधारित गाणे आहे. या गाण्याला संगीतकार संतोष नारायणन यांनी संगीत दिले असून, रहमान यांनी गीतलेखन केले आहे. चिन्मयी श्रीपदा आणि पुन्या सेल्वा यांनी हे गाणे गायले आहे, तर त्याची कोरिओग्राफी पोनी वर्मा यांनी केली आहे. या गाण्यात सामंथा प्रचंड उत्साह आणि ऊर्जेसह नृत्य करताना दिसते.

'मा इंटी बंगाराम' या चित्रपटात सामंथाने दमदार अॅक्शन, कॉमेडी आणि प्रभावी अभिनय साकारला आहे. महिला-केंद्रित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही तो यशस्वी ठरत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दोन दिवसांत या चित्रपटाने जगभरात सुमारे २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे, २०२३ मध्ये सामंथाने 'ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्स' या स्वतःच्या निर्मिती संस्थेची घोषणा केली होती. 'मा इंटी बंगाराम' हा त्याच बॅनरखाली तयार झालेला पहिला चित्रपट असून, सामंथाने यात अभिनेत्रीबरोबरच निर्मात्याची भूमिकाही यशस्वीपणे पार पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news