Salman Khan Maatrubhumi Trailer| देशभक्ती, बलिदान अन्‌ युद्धाची वेदना, ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’चा ट्रेलर पाहिला का?

सलमान खान यांचा दमदार अ‍ॅक्शन अवतार; ‘मातृभूमी’च्या ट्रेलरमधून उलगडली देशभक्ती आणि बलिदानाची कहाणी!
Salman Khan
Salman Khan Maatrubhumi TrailerInstagram
Published on: 
Updated on: 

आजच्या युद्धजन्य आणि अशांत जगात शांततेचा संदेश देणारा सलमान खानचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो तीन ते चार मिनिटांचा आहे. एखाद्या ३० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रीलप्रमाणे हा ट्रेलर आहे.

या चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते, ज्याचे कर्तव्य कधीच संपत नाही. कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्यासाठी अत्यंत अनमोल असतो. वर्दीमागे असणारे कुटुंबीय कायम अनिश्चिततेच्या सावटाखाली कसे जगतात, निरोपाच्या प्रत्येक क्षणी 'ही आपली शेवटची भेट तर नाही ना?' ही भीती मनात कशी असते, हे यात अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडण्यात आले आहे.

Salman Khan
Salman khan on Ramayana : सलमान खानने केले ३ सेकंदात रामायण चित्रपटाचे विश्लेषण!

या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळत आहे. तसेच अप्रतिम व्हिज्युअल्स पाहायला मिळणार आहेत. सलमान खानने पुन्हा एकदा आपल्या डॅशिंग अवतारात प्रेक्षकांवर छाप पाडलीय. अभिनेत्री चित्रांगदा सिंह सलमान खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून दिसते.

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. 'सलमान खान फिल्म्स'च्या बॅनरअंतर्गत हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Salman Khan
Maatrubhumi First Review: ‘मातृभूमी’चा पहिला रिव्ह्यू समोर! सुभाष घई म्हणाले, सलमानचा हा सिनेमा....

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.