
Salman Khan Battle of Galwan motion poster released
मुंबई - सलमान खानच्या नव्या चित्रपटाचा लूक समोर आला आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ असे चित्रपटाचे नाव सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून सलमानने इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये गलवान व्हॅली लिहिलं आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’च्या पोस्टरमध्ये तो एकदम नव्या अंदाजात दिसत आहे. पोस्टरमध्ये सलमानचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. मोठ्या मिशा आणि राग त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
बॅकग्राऊंडमध्ये बर्फाच्छादित पर्वत दिसत आहेत. हा चित्रपट २०२० मध्ये गलवान घाटीमध्ये भारत - चीन सैन्यात झालेल्या खतरनाक हल्ल्यावर आधारित आहे. ही लढाई १५ हजार फूट उंचीवर लढण्यात आली होती. चित्रपटात सलमान खान चित्रपटाची निर्मिती आणि अपूर्व लाखिया दिग्दर्शन करणार आहेत. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री चित्रागंदा सिंह दिसणार आहे. सोबतच चित्रपटात अनेक चेहरे देखील दिसतील. सलमान कर्नल बी.संतोष बाबू यांच्या भूमिकेत असेल. चित्रपटाचे संगीत हिमेश रेशमियाचे आहे.
सलमानच्या पोस्टवर फॅन्सच्या खूप कॉमेंट्स येताहेत. एका युजरने लिहिलं- 'हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बर्फाचे वादळ आणेल, अशी अपेक्षा आहे. आणखी एका युजरने लिहिलं- 'टायगर वापस येत आहे.' दुसऱ्या युजरने म्हटलं की, आता प्रतीक्षा होत नाही.
२०२० मध्ये लडाखच्या गलवान घाटीत भारत - चीनच्या सैन्यांमध्ये एक झडप झाली होती. तो भाग दीर्घकाळ वादग्रस्त सीमा क्षेत्र मानला जातो. १५ जूनला झालेल्या हल्ल्यात दोन्ही देशांच्या सैनिकांचा जीव गेला होता. जवळपास ४५ वर्षांमध्ये भारत-चीन सीमेवर जीव गेले होते. या लढाईत बंदुके चालवण्यात आली नाही. कारण त्या भागात शस्त्रांचा वापर करण्याची मनाई होती. सैनिकांनी काठ्या, दगड आणि हातांनी संघर्ष केला होता.