
tv serial Lakshmi Niwas news updates
मुंबई - 'लक्ष्मी निवास' मालिकेत ज्या नवीन पाहुण्याची चर्चा सर्वत्र होती तो दुसरा कोणी नसून एक ससा आहे. ज्याची एन्ट्री सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या दरम्यान झाली होती. जेव्हा जयंत- जान्हवी, आंनदीला वाचवायला गेलो होतो तिथे जान्हवीला हा छोटासा ससा दिसतो आणि तिला तो प्रचंड आवडतो आणि तिला सरप्राईज देण्यासाठी जयंत सश्याला घरी घेऊन येतो. त्याला पाहून जान्हवी खूप खुश होते, ती त्याच नाव ही बबुचका ठेवते. सेटवर कोणी नवीन शूट करायला आलं कि माहोल बदलून जातो आणि तसाच काहीस झालं 'लक्ष्मी निवास' च्या सेटवर.
मेघन जाधव म्हणजेच जयंतने सश्या बरोबर आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले. "माझ्या अभिनयाच्या प्रवासात मी पहिल्यांदाच एक प्राण्यासोबत शूट करत आहे माझ्यासाठी ही नवीन अनुभव आहे. सश्यासोबत आमचे बरेच सीन सध्या होत आहेत. शूट करताना मज्जा येत आहे, तो इतका गोड आहे आणि तो नाही ती आहे फिमेल ससा आहे. ती लहान आहे ती आमच्यासोबत काम करते, खेळते. जितकं तुम्हाला मालिकेत बघताना मज्जा येत आहे तितकाच आमहाला शूट करताना येत आहे. एका लहान बाळा सारखी आम्ही त्याची काळजी घेतो, कारण शूटिंग म्हंटल कि अनेक उपकरणे सेटवर असतात तर त्या कुठे काही लागू नये याची अत्यंत काळजी घेतली जाते."
दिव्या पुगावकर म्हणजेच जान्हवी म्हणाली, सश्यासोबत काम करण जितकं मजेशीर आहे, तितकाच कठीण ही आहे. कारण त्याला त्याच्या वेळेवर खावं लागत आणि त्याला सारखं उचलून घेतलेल आवडत नाही. त्याला बागडायचं असतं. मी त्याची काळजी घेत सर्व नवीन गोष्टी अनुभवत आहे.
बबुचकच्या येण्याने जयंत-जान्हवीच्या आयुष्यात काय बदल येईल, रोज रात्री ८ वा. झी मराठीवर पाहा.