Salaar film : हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाशी टक्कर घेणार ‘बाहुबली’ स्टार

हृतिक, दीपिका आणि प्रभास
हृतिक, दीपिका आणि प्रभास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासचा आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. चित्रपट 'सलार'च्या (Salaar film) निर्मात्यांनी सांगितलं हों की, आज ते एक मोठी घोषणा करणार आहेत. यानंतर चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली. पण, दरम्यान, हृतिक रोशन-दीपिका पादुकोणच्या चित्रपटाशी बाहुबली स्टारचा चित्रपट क्लॅश होईल. (Salaar film)

'बाहुबली' स्टार प्रभासच्या आगामी प्रोजेक्ट 'सलार'ची चर्चा होतीय. यामध्ये प्रभास जोरदार ॲक्शन भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 'KGF' फ्रेंचाइजी दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित करत आहे. प्रशांत आणि प्रभासचा कॉम्बिनेशन स्क्रीनवर काय धुमाकूळ घालेल, हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे.

चित्रपट निर्मात्यांनी सालारच्या रिलीज डेटची घोषणा कली. 'सलार' २८ सप्टेंबर, २०२३ रोजी रिलीज होईल. म्हणजेच एक वर्षाहून अधिक या चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागेल.

 'फायटर'शी क्लॅश

प्रभासच्या 'सलार'सोबत हृतिक रोशन-दीपिका पादुकोणचा एरियल-ॲक्शन चित्रपट 'फायटर' रिलीज डेटदेखील २८ सप्टेंबर २०२३ आहे. जर दोन्ही चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये कुठलाही बदल होत नाही. तर हा दिवस दिन बॉक्स ऑफिससाठी दिवाळीपेक्षा कमी  नसेल.

एकीकडे हृतिक-दीपिका तर दुसरीकडे प्रभास. तसेच 'प्रोजेक्ट के' नावाच्या एका चित्रटात प्रभास आणि दीपिकादेखील एकत्र काम करत आहे. 'फायटर'च्या घोषणेनंतरही फॅन्सध्ये खूप उत्सुकता आहे. 'सलार' साठी प्रभासचे चाहते खूप प्रतीक्षा करत आहेत.

हेदेखील वाचा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news