Marathi Movie Sajana Trailer | प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य 'सजना' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Marathi Movie Sajana Trailer | प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे
image of Movie Sajana poster
Marathi Movie Sajana Trailer released Instagram
Published on
Updated on

Marathi Movie Sajana Trailer released

मुंबई - प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड! "सजना" चित्रपटातून अशीच प्रेमकथा पाहायला मि‍ळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. म्हणजेच सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपित करण्यात आला. या ट्रेलर मध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट आपण पाहू शकतो.

image of Movie Sajana poster
Mannara Chopra Father Dies | प्रियांका चोप्राची चुलत बहिण अभिनेत्री मन्नारा चोप्राला पितृशोक

शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत "सजना' सिनेमातील ह्या ट्रेलर मध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येतात अनेक संघर्ष. मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सुड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सर्व काही संपलं, तेव्हाच ही कथा घेते एक अनपेक्षित वळण, जे तुमचं मन सुन्न करतं. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

image of Movie Sajana poster
Karishma-Sunjay Kapur | 'आम्हाला संजय कपूरच्या पैशांची गरज नाही': रणधीर कपूरनी करिश्माच्या लग्नाबाबत उघड केली 'ही' मोठी गोष्ट

'सजना' या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून रोमँटिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनले आहेत. "सजना" २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news