

Randhir Kapoor on Sunjay Kapur Money
मुंबई - करिश्मा कपूर हिचा एक्स पती संजय कपूरचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी संजयने हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. यामुळे कपूर कुटुंबासह मनोरंजन उद्योग आणि व्यावसायिक जगात शोककळा पसरली आहे. संजयच्या मृत्यूनंतर, करिश्माशी त्याचा घटस्फोट पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, करिश्मा कपूरचे वडील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मी कधीच त्यांच्या लग्नाला मान्यता दिली नाही. आम्हाला त्यांच्या पैशांची गरज नाही, असे करिश्मा कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी म्हटलंय.
ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी एकदा खुलासा केला होता की, ते त्यांची मुलगी करिश्मा कपूरचे लग्न उद्योगपती संजय कपूरशी करण्याबाबत तीव्र विरोधात होते. त्यांनी स्पष्ट केले होते की, कपूर कुटुंबाला टिकण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी संजयच्या पैशांची गरज नाही.
२०१६ मध्ये, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर यांनी संजय कपूरवर उघडपणे टीका केली होती आणि करिश्मा आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाच्या अफवांना स्पष्ट केले. "आमच्या ओळखी सर्वांनाच माहीत आहेत. आम्ही कपूर आहोत. आम्हाला कोणाच्या पैशामागे धावण्याची गरज नाही. आम्हाला केवळ पैशाचेच आशीर्वाद मिळालेले नाहीत, तर आमची प्रतिभा आयुष्यभर आम्हाला आधार देऊ शकते," असे रणधीर म्हणाले. करिश्माने संजयशी त्याच्या पैशासाठी लग्न केले असे दावे करण्यात आले होते. पण करिश्माने कधीच त्यांच्याशी लग्न करु नये, असे मला वाटत होते, असेही हे म्हणाले.
रणधीर म्हणाले, ''सुरुवातीपासूनच या लग्नाबद्दलचा आपला विरोध लपवला नाही. त्याने कधीही त्याच्या पत्नीची काळजी घेतली नाही. तो तिला खूप पैसे देत आहे आणि दुसऱ्या महिलेसोबत राहतो. संपूर्ण दिल्लीला तो कसा आहे हे माहित आहे. मला यापेक्षा जास्त काही बोलायचे नाही.''
दरम्यान, घटस्फोटानंतर सध्या करिश्मा ही एकटी आई म्हणून तिच्या मुलांचे संगोपन करत आहे. घटस्फोटानंतर संजय हा आपल्या मुलांच्या संगोपनासाठी दरमहा करिश्माला मोठी रक्कम देत होता; मात्र संजयच्या मृत्यूनंतर हे सर्व थांबण्याची शक्यता आहे. घटस्फोट झाल्यावर संजयने खार येथील त्याच्या वडिलांचे घर करिश्माच्या नावावर केले. इतकेच नाही, तर संजयने त्याच्या मुलाच्या नावाने १४ कोटींचा बाँड खरेदी केला. संजयच्या मृत्यूनंतर, करिश्माला मिळणारी मोठी रक्कम रोखण्यात येईल; मात्र यावद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. संजय हा मुले समायरा आणि किवानच्या संगोपनासाठी दरमहा करिश्माला १० लाख रुपये देत होता. त्याने करिश्माला पोटगी म्हणून ७० कोटी रुपये दिले होते. घटस्फोटादरम्यान, करिश्माने संजयवर तिला मारहाण करण्याचा आरोप केला होता.