

Mannara Chopra Father Death
मुंबई - प्रियांका चोप्राची चुलत बहिण मन्नारा चोप्रा हिचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले. त्यांनी १६ जून रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. मन्नाराने अंतिम संस्काराची माहिती देत ही दु:खद घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये तिने लिहिलंय- ‘खूप दु:ख आणि वेदनसोबत, मी माझ्या प्रेमळ वडिलांच्या निधनाची माहिती शेअर केलीय, जे 16/06/2025 रोजी आम्हाला सोडून गेले. ते आमच्या परिवारासाठी शक्ती स्तंभ होते.’
फादर्स डेच्या एक दिवसानंतर मन्नाराच्या वडिलांचे निधन झाले.
विमानतळावर मन्नारा स्पॉट झाली. यावेळी ती खूप चिंतेत दिसली. मन्नाराने ही देखील माहिती दिली की, अंत्यसंस्कार १८ जून रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये अंबोलीच्या स्मशानभूमीत होईल. रमन राय हांडा यांच्या परिवारात पत्नी कामिनी आणि मुली मन्नारा व मिताली आहेत.
निधनाची माहिती मिळताच मन्नारा चोप्रा मुंबईत परतली. ती काल रात्री मुंबई विमानतळावर बहिन मिताली हांडा सोबत दिसली.
मनाराने २०१४ मध्ये जिद चित्रपटातून डेब्यू केला होता. नंतर ती दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. तिला लोकप्रियता मिळाली ती रिॲलिटी शो बिग बॉस-१८ मधून. अखेरला ती लाफ्टर शेफ्स सीजन २ मध्ये दिसली होती.