

Saiyaara-Mahavatar Narsimha Box Office Collection
मुंबई - सैयारा रिलीज होऊन १८ दिवस झाले आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन थोडे मंदावले असून १८ व्या दिवशी अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या या चित्रपटाने भारतात ३०० कोटींचा टप्पा ओलांडलाय. पण 'महावतार नरसिंहा' आता इतर रिलीजपेक्षा वरचढ ठरत असल्याने त्याची कमाई मंदावलीय.
चित्रपट रिलीज झाल्यापासून सैयाराने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपटाला तरुणाईने तर खूप पसंती दिली. आता तिसऱ्या आठवड्यात सैयाराने एन्ट्री केलीय. दरम्यान, महावतार नरसिंह चित्रपटाने गती घेतली आहे. या चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. त्याचवेळी १ ऑगस्टला सन ऑफ सरदार २ आणि धडक २ च्या रिलीजचाही परिणाम दिसून येतो. या सर्व चित्रपटांवर 'महावतार नरसिंह' भारी पडला आहे.
सध्या थिएटरमध्ये सैयाराला चांगला प्रेक्षक वर्ग आहे. शनिवार-रविवारी सैयाराने अनुक्रमे ६.७५ कोटी आणि ८ कोटी कमावले. अखेर सोमवारी हा चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला. सोमवारी १८ व्या दिवशी १.५४ कोटींची कमाई केली. असे मिळून नेट कलेक्शन ३०१.२९ कोटी रु. भारतात झाले आहे.
पण सैयाराला स्पर्धा आहे ती महावतार नरसिंह चित्रपटाची. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे सैयाराच्या कमाईत घट झाली. तरीही, एकूणच चित्रपटाची कमाई चांगली आहे.
रिपोर्टनुसार, 'सैयारा'चा थिएटर रन कमी केला जाईल. कारण 'वॉर २' प्रदर्शित होणार आहे. 'सैयारा'च्या यशाचे कारण म्हणजे तो कोणत्याही फ्रँचायझीचा भाग नाही किंवा तो मोठ्या बजेटचा अॅक्शन चित्रपट नाही. कुठलेही प्रमोशन नाही. शिवाय तरुणाईने मोठ्या प्रमाणात दिलेला प्रतिसाद ... या सर्व गोष्टी एकूणच कारणीभूत ठरल्या आहेत.
Day 1 - 21.5 कोटी
Day - 226 कोटी
Day 3 - 35.75 कोटी
Day 4 - 24 कोटी
Day 5 - 25 कोटी
Day 6 - 21.5 कोटी
Day 7 - 19 कोटी
पहिला आठवडा एकूण कलेक्शन - 172.75 Cr -
Day 8 - 18 कोटी
Day 9 - 26.5 कोटी
Day 10 - 30 कोटी
Day 11 - 9.25 कोटी
Day 12 - 10 कोटी
Day 13 - 7.5 कोटी
Day 14 - 6.5 कोटी
दुसरा आठवडा कलेक्शन - 107.75 कोटी
Day 15 - 4.5 कोटी
Day 16 - 6.75 कोटी
Day 17 - 8 कोटी
Day 18 - 1.54 कोटी
एकूण - 301.29 कोटी