Saiyaara Music Tanishk Bagchi |आम्ही करून दाखवलं.. 'सैयारा' चित्रपटाचे संगीतकार तनिष्क बागचींनाही आवरले नाही अश्रू

Saiyaara Music Tanishk Bagchi ahaan pandayy aneet padda | फॅन्सच्या तीव्र प्रतिक्रियांना तनिष्क बागचींचे समर्थन; चित्रपट पाहिल्यानंतर म्हणाले..
image of saiyaara movie
Tanishk Bagchi talks about Saiyaara musicInstagram
Published on
Updated on

Tanishk Bagchi on Saiyaara music

मुंबई - 'सैयारा'चे टायटल ट्रॅक फहीम अब्दुल्लाने आपला आवाज दिला आहे. हे गाणे ट्रेंडवर तर आहेच शिवाय तरुणाईमध्ये त्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. टायटल ट्रॅकचे संगीत तनिष्क बागची यांचे आहे. तर बोल इरशाद कामिल यांनी लिहिले आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपट स्वत: संगीतकार तनिष्क बागची यांनी लिहिलं आहे. आता हा चित्रपट खुद्द तनिष्क बागची यांनी पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी भावूक झालेल्या तरुणाईचे समर्थन केले आणि काय प्रतिक्रिया दिलीय पाहा.

ग्लोबल ट्रेंडवर सैयाराचे टायटल ट्रॅक

सैयाराची धून इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरदेखील पसंतीस उतरली आहे. हे गाणे आता ग्लोबल व्हायरल ५० चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारे पहिले भारतीय गाणे ठरले आहे. ‘सैयारा’च्या टायटल ट्रॅकने Justin Bieber, Billie Eilish, Sabrina Carpenter, Lady Gaga, Bruno Mars, Blackpink सारख्या ग्लोबल कलाकारांना मागे टाकले आहे.

अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या 'सैयारा'ची क्रेझ तरुणाईवर अद्याप देखील आहे. लोक रडत आहेत, ओरडत आहेत, तरूणांसह तरुणींना देखील भावना अनावर झालेल्या दिसताहेत. काही जण त्यांना वेड्यात काढत आहेत तर काही जण त्यांना पाठिंबा देत आहेत. आता संगीतकार तनिष्क बागची यांनीही प्रेक्षकांच्या तीव्र प्रतिक्रियेचे समर्थन केले आहे.

image of saiyaara movie
Ruchi Gujjar | अभिनेत्री रुची गुज्जरचा राडा; 'So Long Valley' निर्मात्याच्या अंगावर धावत चप्पलेनं मारलं

काय म्हणाले तनिष्क बागची?

तनिष्क बागची एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, "या चित्रपटातील संगीत तुम्हाला त्रास देते. ते तुम्हाला अशी भावना देते की, तुम्ही कोणीतरी गमावले आहे, तुम्हाला 'या फिर कोई जुदा हुआ है पर फिर भी आपके पास नहीं है' हे एक शीर्षकगीत एक अद्भूत भावना व्यक्त करतो. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला मीही रडलो."

तनिष्क बागचीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर करत लिहिले, 'आम्ही करून दाखवलं. सैयारा आता ग्लोबल व्हायरल... नंबर १ आहे. हा क्षण त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी या गाण्यात आपले मन गुंतवले आहे. भारतीय संगीत आता उदयास येत नाहीये, ते आता उंच भरारी घेत आहे - आणि सैयारा हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.'

image of saiyaara movie
Sarzameen actor Prithviraj Sukumaran: कोच्चीमध्ये पॉश बंगला-लक्झरी कार अन् कोटींचा मालक असलेला सरजमीन फेम अभिनेता पृथ्वीराज कोण आहे?

आणखी एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना ते म्हणाले 'लोक म्हणत होते की, मी केवळ रीक्रिएशन करतो. पण आथा सिद्ध करून दाखवलं आहे की, मी ओरीजीनल संगीतात देखील कमाल करू शकतो.'

सैयारा बॉक्स ऑफिस कलेक्शन

सैयाराचे कलेक्शन आतापर्यंत २४८.४६ कोटी आहे. चित्रपटाला रिलीज होऊन ११ दिवस झाले आहेत. ११ व्या दिवशी सैयाराने ३ कोटी कमावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news