

Ruchi Gujjar controversy
मुंबई - मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात अभिनेत्री रुची गुज्जरने 'So Long Valley' चित्रपटाचे निर्माते करण सिंह चौहान विरोधात फसवणूक, विश्वासघात आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली FIR दाखल केलीय. हे प्रकरण हिंदी टेलिव्हिजन मलिकेच्या को-प्रोडक्शन वरून २४ लाख रुपयांच्या आर्थिक वादावरून जोडला गेला आहे.
रुची गुज्जर निर्मात्याच्या अंगावर धावली आणि चप्पल मारली. गुरुवारी मुंबईतील एका थिएटरमध्ये सो लॉन्ग व्हॅली चित्रपटाचे स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंग दरम्यान मुंबईतील सिनेपोलिस थिएटरमध्ये रुची गुज्जर विरोध आंदोलन करत काही लोकांसमवेत तिथे पोहोचली. रुची आणि इतर लोकांच्या हातात सो लॉन्ग व्हॅलीचे पोस्टर्स होते, ज्यावर रेड क्रॉसचं निशाण होतं. भांडणात रुचीने निर्मात्यांला चप्पल मारले. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रुची गुज्जरचं म्हणणं आहे की, करण सिंह चौहानने मागील वर्षी तिच्यासोबत करार केला होता आणि त्यांनी दावा केला होती की, ते एक हिंदी टीव्ही शोची निर्मिती करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुची म्हणाली, "त्यांनी मी सह-निर्माता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्याशी संबंधित प्रस्तावाची कागदपत्रे देखील पाठवली.
रुचीने सांगितले की, या प्रस्तावावर विश्वास ठेवत तिने जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ य दरम्यान आपली कंपनी एसआर इव्हेंट अँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून करणच्या स्टुडिओशी जोडलेल्या खात्यांमध्ये अनेक पेमेंट ट्रान्सफर केले. पण, प्रोजेक्ट कधीच सुरू झाला नाही. रुची म्हणते की, जेव्हा तिने तिचे पैसे मागितले तेव्हा त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. रुचीने मुंबईत करण सिंगविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
राजस्थानच्या गुर्जर परिवारात रुची गुर्जरचा जन्म झाला. ती एक मॉडल असून २०२३ मध्ये मिस हरियाणाचा किताब आपल्या नावे केला होता. जब तू मेरी न सही आणि हेलीमध्ये चोर सारख्या म्युझिक व्हिडिओजमध्येही दिसली. यावर्षी रुचीने मेट गालामध्ये ट्रॅडिशनल लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते.