

who is Prithviraj Sukumaran Sarzameen actor
मुंबई - पृथ्वीराज सुकुमारन एक दाक्षिणात्य अभिनेता असून तो निर्माता, गायक, दिग्दर्शक आणि ॲक्शन कोरिओग्राफर देखील आहे. तो मल्याळम चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण हिंदी, तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे. पृथ्वीराज सुकुमारनचा जन्म १६ ऑक्टोबर, १९८२ रोजी केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये झाला. पृथ्वीराजचे आई-वडील अभिनेते सुकुमारन आणि मल्लिका आहेत. पृथ्वीराजने २००२ मध्ये मल्याळम चित्रपट ‘नंदनम’मधून करिअरची सुरुवात केली. आता तो काजोल, इब्राहिम अली खान स्टारर सरजमीन चित्रपटामुळे चर्चेत आहे.
रिपोर्टनुसार, पृथ्वीराज सुकुमारनची एकूण संपत्ती जवळपास ५४ कोटी रुपये आहे. २०२४ मध्ये त्याने दोन चित्रपटांतून जवळपास २५० कोटी रुपयांची कमाई केली होती. अदुजीविथम: द गोट लाईफने बॉक्स ऑफिसवर १६० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. गुरुवायूर अंबालानदायिलने ९० कोटी रुपये कमावले होते. ‘एल2: एम्पुरान’नेदेखील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. पृथ्वीराज एका चित्रपटासाठी ४ ते १० कोटी रुपये फी घेतो.
पृथ्वीराज सुकुमारनने १७ कोटींचा आलिशान बंगला मुंबईतील पाली हिलमध्ये खरेदी केला आहे. ३० कोटींची ऑफिस जागा मुंबईमध्ये आपल्या प्रोडक्शन कंपनीसाठी खरेदी केलं होतं. याशिवाय, केरळच्या कोच्चीमध्ये देखील त्याचा एक आलिशान बंगला आहे.
लँड रोवर डिफेंडर ११०, एक पोर्श कॅयेन, ४.३७ कोटींची लम्बोर्गिनी आणि एक रेंज रोवर वोग आहे, त्याची किंमत २.३७ कोटी रुपये आहे. अनेक भाषांमध्ये काम पृथ्वीराज सुकुमारनने तमिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम असे मिळून ११० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, चार केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, एक तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, सात एसआयआयएमए पुरस्कार आणि एक दक्षिण फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.
तो हाय टेक ॲम्बुलेन्स सेवा आणि अनेक सामाजिक कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. अइय्या (२०१२), औरंगजेब (२०१३), नाम शबाना (२०१५), बडे मियां छोटे मियां (२०२४) या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट जवळपास ३५० कोटी रुपये होतं.