पुढारी ऑनलाईन डेस्क : सण-उत्सवाच्या काळात सर्वच जण नटतात. खासकरून सेलिब्रिटींचा लूक पाहण्यासारखा असतो. यामध्ये मराठी स्टार्सदेखील मागे नाहीत. आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही आपला साडीतील (saie tamhankar ) खास लूक आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. हा लूक तिचा फेस्टिव्ह सीझनमधील आहे. नाकात नथ, फ्लोरल साडी, गळ्यात दागिने आणि एकापेक्षा एक अदांनी तिने सर्वांनाच घायाळ केलं आहे. सईने हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. केसांचा सुंदर अंबाडा घातला आहे. नाकात नथ आणि ईअररिंग्ज घालत तिने आपला लूक कम्प्लिट केला आहे. (saie tamhankar)
सईने या फोटोंना Festive Feels … #saitamhankar #yellowsaree #saree #नथ #bappamoraya अशी कॅप्शन लिहिलीय. तिच्या कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट्स पहायला मिळत आहेत.
तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मात्र कमेंट करण्याचा मोह आवरलेला नाही. ❤️❤️❤️, sundari ?, निस्ता सुंदरपना ! निस्ती नज़ाकत !, कातिल ?, गौरव मोरे ची कॉपी केली आहे ??, हास्य जत्रेत अशी pose बघायला मिळणार आता ??? बाकी तू आहेसच kamalllllll, Gaurya bolala ti pose konti ? ?…?❤️?, काटा रुते कोणाला ??❤️, ??????❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ kamaaallllllll, ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ किती सुंदर ??? अशा कमेंट्स देऊन चाहत्यांनी तिच्या रुपाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, सईला तिच्या मिमी सिनेमामधील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 'मिमी' चित्रपटात सई 'शमा'च्या भूमिकेत आहे. कृती सेननने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. कृतीची बेस्ट फ्रेंड म्हणून सईने व्यक्तीरेखा साकारली आहे. शिवाय या चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे.
यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिमीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून सईला गौरवण्यात आले. या सोहळ्या दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि सई दिसत आहे. तिला 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीरने तिचा हात हातात घेत हातावर किस केलं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सगळीकडे व्हायरल झाला. यावेळी सई लाजतानाही दिसतेय.
photo- filmfare insta वरून साभार