

Sagarika Ghatge-Zaheer Khan revealed child face
मुंबई - चक दे इंडिया सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना चकित करणारी अभिनेत्री सागरिका घाटगेने आपल्या बाळाचा चेहरा पहिल्यांदाच दाखवला. फादर्स डे निमित्त सोशल मीडियावर तिने बाळाचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोमध्ये बाळासोबत तिचा पती जहीर खान देखील आहे. तिने फोटो पोस्टला कॅप्शन दिली की, 'मी कॅप्शन लिहिणारी नाही, पण आज मी लिहित आहे. कारण आमचा मुलगा कधी तरी हे वाचेल, आणि त्याला हे जाणून घ्यायची गरज आहे.
सागरिकाने पुढे म्हटलंय- तो आमच्यासाठी खूप भाग्यशाली आहे. तुम्ही जो सर्वांसाठी इतके प्रेमळ आहात, सर्वांची काळजी करता, धैर्य...शांत ..शक्ती -जर मोठा होऊन तुमच्यासारखा थोडा जरी तो बनला तरी खरंच खास ठरेल....कठीण समयी देखील तुम्ही स्थिर राहता, आणि मौन राहता आणि तरीही हजारों शब्द म्हणण्याची शक्ती - ही ती गोष्ट आहे, जी तुम्हाला परिपूर्ण बनवते. आमच्या मुलासमोर सर्वात चांगलं उदाहरण आहे.
सागरिका-जहीरने १६ एप्रिलला आपल्या पहिल्या बाळाविषयी घोषणा केली होती. त्यांनी बाळाचे नाव फतेसिंह खान ठेवलं. फादर्स डेला फोटो पोस्ट करून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी बाळाची झलक देखील सोशल मीडियावर दिसली नव्हती.