

Saif Ali Khan Case suspected accused Mumbai police oppose bail
मुंबई : सैफ अली खान वर हल्ला करणारा बांगलादेशी शरीफ-उल खानच्या विरोधातील पुरावे पाहता हल्ला करणारा हाच असल्याचे दिसून आल्याने त्याचा जामीन फेटाळाला आहे. शरीफ-उल खान याने जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मुंबई पोलिसांनी त्याच्या जामीनाचा विरोध केला आहे.
फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या रिपोर्टचा हवाला देत पोलिसांनी सत्र न्यायालयाच्या समक्ष दावा केला की, फॉरेन्सिक तपासात वापरण्यात आलेला चाकू आणि आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या चाकूचे तुकडे एकच आहेत. आरोपी सध्या तुरुंगात आहे आणि त्याला जामीन मिळू नये. अभिनेत्याला लागलेल्या चाकूचे हे तुकडे त्याच चाकूचे होते, ज्याच्या वापर हल्ला करण्यासाठी करण्यात आला होता.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी एक बांग्लादेशी नागरिक आहे, जो भारतात अवैध पद्धतीने राहत आहे. जर त्याला जामीन मिळाल तर तो भारतातून पळून जाण्याची शक्यता आहे. आरोपीने केलेला गुन्हा खूप गंभीर स्वरुपाचा आहे आणि त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. दुसरीकडे, वकिलाच्या माध्यममातून दाखल केलेल्या जामीन याचिकेत आरोपीने दावा केला की तो निर्दोष आहे आणि त्याचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.
सैफ वर १६ जानेवारीला बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी अपार्टमेंटच्या १२ व्या मजल्यावर एका चोराने चोरीच्या प्रयत्नाने सैफवर अनेक वार केले होते. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्याला पाच दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकाल पोलिसांनी अटक केली होती.