Rubina Dilaik
Rubina Dilaik

Rubina Dilaik : ‘या’ अभिनेत्रीला विकावे लागले होते स्वतःचे घर

Published on

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री रुबिना दिलैक ( Rubina Dilaik ) ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री असून एकेकाळी तिला आपले घरसुद्धा विकावे लागले होते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. एका मालिकेत नऊ महिने काम केल्यानंतर संबंधित निर्मात्याने तिला मानधनच दिले नव्हते. याबद्दल जाब विचारला असता सेटवर उशिरा येत होतीस आणि त्यामुळे तुला छदामही मिळणार नाही, असे उत्तर देण्यात आले होते.

'छोटी बहू' या मालिकेत तिने दमदार अभिनय केला होता. मात्र, नंतर तिला एका मालिकेत सोळा लाखांचा फटका बसला. त्यामुळे तिला आपले राहते घरही विकावे लागले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतातच. रुबिनाही त्याला अपवाद ठरली नाही. सध्या मात्र ती चित्रिकरणात व्यस्त आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news