Madhuri Dixit : धक धक गर्लचे घरसुद्धा दिल की धडकन वाढवणारे…

Madhuri Dixit
Madhuri Dixit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये अफाट यश मिळवल्यानंतर निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. आजसुद्धा ती विविध जाहिरातींत आणि चित्रपटांत झळकताना दिसते. मात्र, यावेळी चर्चा सुरू झाली आहे ती तिने मुंबईतील वरळी येथे खरेदी केलेल्या आलिशान घराची.

एका उत्तुंग अपार्टमेंटच्या 53 व्या मजल्यावर असलेल्या या आशियानासाठी माधुरीने तब्बल 48 कोटी रुपये खर्च केले आहेत. या घरातून अरबी समुद्र आणि महालक्ष्मी रेसकोर्सचे विहंगम द़ृश्य दिसते. नव्वद हजार रुपये प्रतिचौरस फूट या दराने हा व्यवहार झाला आहे. मुद्रांक शुल्क म्हणून तिने 2 कोटी 40 लाख रुपये भरले आहेत. 'मजा मा' हा माधुरीचा चित्रपटही नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news