पुष्पाच्या दुसर्‍या भागात अर्जुन कपूर झळकणार | पुढारी

पुष्पाच्या दुसर्‍या भागात अर्जुन कपूर झळकणार

पुढारी ऑनलाईन : पुष्पा या अफाट गाजलेल्या चित्रपटाच्या दुसर्‍या भागात अर्जुन कपूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘पुष्पा 2’ ला बॉलीवूड टच देण्यासाठी निर्माते अर्जुन कपूरला चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

चित्रपटात अर्जुन पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांना तो ‘पुष्पा : द राइज’ पेक्षा भव्य बनवायचा आहे आणि बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रेक्षकांनाही आपल्या सोबत जोडून ठेवायचे आहे. या पात्राची छटा नकारात्मक असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.

या चित्रपटात अर्जुन कपूर दिसणार असेल तर हा त्याचा पहिला तेलगू चित्रपट असेल. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपटही प्रेक्षकांना फारसा आकर्षित करू शकला नाही. अशा परिस्थितीत अर्जुनने पुष्पामध्ये काम केले तर ते त्याच्या करिअरसाठी खूप चांगले असेल. अद्याप अर्जुनकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button